Homeताज्या बातम्या

तोहीद खान हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावीकामरान खान शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख बीड

परळी : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात दि. 2 जून रोजी तोहीद खान यांची झालेली निर्घृण हत्या अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्या

बीड एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवारांची भरती
गुलाब देत पोलीस म्हणाले, जीव तुमचा आहे अन् नियमही तुमच्यासाठीचबीड पोलीसांनी फुलातून फुलवला वाहतुक शिस्तीचा संदेश
बीड बायपासवर शेतकर्‍यांचा भव्य रास्ता रोकोसर्व्हिस रोड व स्लिप रोड 600 मीटर वाढविण्याची मागणी


परळी : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात दि. 2 जून रोजी तोहीद खान यांची झालेली निर्घृण हत्या अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याची प्रतिक्रिया शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख कामरान खान यांनी व्यक्त केली.
या घटनेनंतर कामरान खान यांनी परळी येथे जाऊन स्वर्गीय तोहीद खान यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मृताच्या बंधू फिरोज खान यांची भेट घेऊन कुटुंबाला धीर दिला तसेच न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रकारची कायदेशीर मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना कामरान खान म्हणाले की, ज्या पद्धतीने तोहीद खान यांची अमानुष आणि क्रूर हत्या करण्यात आली आहे, तो अत्यंत जघन्य स्वरूपाचा गुन्हा असून या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्यासच समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल. स्व. तोहीद खान यांच्या लहान मुलांची अवस्था आणि संपूर्ण कुटुंबावर कोसळलेले दुःख पाहून मन हेलावून गेल्याचेही त्यांनी सांगितले. पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. या प्रसंगी बीड जिल्हा कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष शेख सोहेल,काँग्रेस शहर उपाध्यक्ष शेख आहेतेशाम,उस्मानिया फाऊंडेशन शेख असेफ माजलगाव,व परिसरातील नागरिक व समाजबांधव उपस्थित होते.

COMMENTS