Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाईचे श्राद्ध ! देवळाली प्रवरात श्रद्धा, परंपरारेचा अनोखा संदेश

देवळाली प्रवरा : घरातील माणूस गेल्यावर जसे विधी केले जातात, तसेच विधी गावरान गाईसाठी करण्यात येत आहेत. देवळाली प्रवरा येथे ३० वर्षे कुटुंबासारखा स

रिक्षा-बसच्या अपघातात तिघे ठार 
बेबी बर्डे देवळाली प्रवराचे उपनगराध्यक्ष 
हॉटेल कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

देवळाली प्रवरा : घरातील माणूस गेल्यावर जसे विधी केले जातात, तसेच विधी गावरान गाईसाठी करण्यात येत आहेत. देवळाली प्रवरा येथे ३० वर्षे कुटुंबासारखा सांभाळ केलेल्या गाईचे प्रथम वर्षश्राद्ध आयोजित करण्यात आले असून, या आगळ्या-वेगळ्या सामाजिक-धार्मिक उपक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा होत आहे.

 गिताराम बाबूराव वाळूंज व अक्षय गिताराम वाळूंज यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमातून गाईचे ग्रामीण जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. ३० वर्षांपूर्वी दान मिळालेल्या या गावरान गाईने ११ वेळा वासरांना जन्म दिला. शांत स्वभावामुळे गावकरी तिला प्रेमाने ‘बगळी’ म्हणत. वृद्धापकाळाने ११ जानेवारी २०२५ रोजी तिचे निधन झाले.

 गाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ ११ जानेवारी २०२६ रोजी प्रथम वर्षश्राद्ध होणार असून, धार्मिक विधींसह गाईच्या सेवेवर भर देण्यात येणार आहे.वर्षश्राद्धा निमित्त ह.भ.प.बाबा महाराज मोरे यांचे प्रवचन होणार आहे. या कार्यक्रमाला गावकरी, शेतकरी व गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 गाईचे संवर्धन, ग्रामीण संस्कृतीचा सन्मान आणि नव्या पिढीला संदेश देणारा हा उपक्रम देवळाली प्रवरच्या सामाजिक जीवनात वेगळी ओळख निर्माण करणारा ठरत आहे.

COMMENTS