संगमनेर: भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव संगमनेर शहरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपू

संगमनेर: भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव संगमनेर शहरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘आय लव्ह संगमनेर’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांना नागरिक आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
गुरुपौर्णिमेनिमित्त शहरातील दत्त मंदिर (बस स्टँड), स्वामी समर्थ केंद्र (म्हाळुंगी पूल) तसेच गंगामाता मंदिर (गंगामाई घाट) येथे विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. मैथिली तांबे यांनी विविध मंदिरांना भेट देऊन श्री दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ आणि गंगामातेचे दर्शन घेत विधीवत पूजन केले. सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी मनोभावे प्रार्थना केली.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद कार्यक्रमात उपस्थित राहून डॉ. मैथिली तांबे यांनी भाविकांना स्वतः महाप्रसादाचे वाटप केले. मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. मोठ्या संख्येने भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवत भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला.
गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नसून जीवनाला योग्य दिशा देणारा, संस्कारांची शिकवण देणारा आणि समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेणारा दीपस्तंभ आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.

COMMENTS