Homeताज्या बातम्या

राज्य गुणवत्ता यादीत 8 वा क्रमांक; कु. प्रांजल पोकळे शिष्यवृत्ती धारक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 (इयत्ता 5 वी) मध्ये वसुंधरा प्राथमिक विद्यालय, आष्टी येथ

आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांसाठी 14 कोटी 14 लाख निधीची मागणीआ. सुरेश आण्णा धस यांच्याकडे डॉ. गणेश ढवळे यांचे निवेदन
शाँर्ट सर्किटमुळे केसर आंब्याची बाग जळुन खाकआष्टी तालुक्यातील बीड सांगवी – गणगेवाडी येथील घटना; शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान
पत्रकार अमजद शेख यांचा अनोखा वाढदिवस2,100 झाडांची लागवड करून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 (इयत्ता 5 वी) मध्ये वसुंधरा प्राथमिक विद्यालय, आष्टी येथील विद्यार्थिनी कु. प्रांजल जालिंदर पोकळे हिने 300 पैकी 280 गुण (93.3333 टक्के) प्राप्त करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 8 वा क्रमांक मिळवला आहे. या उल्लेखनीय यशामुळे ती शिष्यवृत्ती धारक ठरली आहे.
कु. प्रांजलच्या या यशामागे तिची खडतर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास याबरोबरच वर्गशिक्षिका श्रीमती कर्डिले मॅडम यांचे परिश्रम तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री मनोरंजन धस यांचे वेळोवेळी लाभलेले मोलाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री मनोरंजन धस, वर्गशिक्षिका श्रीमती कर्डिले मॅडम, वसुंधरा प्राथमिक विद्यालय, आष्टी येथील सर्व शिक्षक, नातेवाईक व हितचिंतकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच तिचे मामा श्री विठ्ठल आजबे व नातेवाईकांनी तिचा विशेष सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कु. प्रांजलचे वडील जालिंदर ब. पोकळे हे न्यायालयात कार्यरत असून, आई शिक्षिका आहेत. आपल्या मुलीच्या या यशाबद्दल त्यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री मनोरंजन धस, वर्गशिक्षिका श्रीमती कर्डिले मॅडम, तसेच वसुंधरा प्राथमिक विद्यालय, आष्टी येथील सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच भविष्यातही प्रांजलने अशीच यशस्वी वाटचाल करून  गाव व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
———-

COMMENTS