Homeकृषी

नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन

आष्टी तालुक्यातील नांदुर (विठ्ठलाचे) येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयातील

महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार
पिंपरी येथे शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क निर्मितीसाठी ड्रम वाटप
धुनकवाड सेवा सहकारी सोसायटीचे सचिव अशोक कीर्तने यांचा सत्कार



आष्टी तालुक्यातील नांदुर (विठ्ठलाचे) येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्याथ्यांचे नांदुर गावामध्ये आगमन झाले आहे. यावेळी कृषीदूत सुहास गुंड, विशाल गवारे,अक्षय रणसिंग, तुषार विधाते, स्वराज एकशिंगे, युवराज गव्हाणे, ओंकार गुंड, विशाल पठारे यांचे नांदुर गावातील सरपंच, उपसरपंच,ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी स्वागत केले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.आरसुळ सर, तसेच कृषी कार्यानुभव कार्यक्रम समन्वयक प्रा. रोहिणी शिंदे मँडम, व कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.आर.काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2026-27 अंतर्गत शेतकर्‍यांना विविध कृषी विषयांची सविस्तर माहिती दिली. यावेळी नांदूर गावाचे सरपंच संजय विधाते, उपसरपंच विलास गवळी,शुभम विधाते,सागर विधाते सह ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS