Homeताज्या बातम्या

तुलसी कॉलेजमध्ये वन महोत्सव अंतर्गत रांगोळी स्पर्धा संपन्न

देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित ’वन महोत्सव सप्ताह-2026’ अंतर्गत तिसर्‍या दिवशी

‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६’ ला मंत्रिमंडळाची मंजुरी; जलजीवन मिशन २.० च्या देखभालीसाठी आराखडा तयार होणार
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने चकलांबा ग्रामपंचायतीचा पाणी बचतीचा निर्णय; तलावातील पाणी उपशाला पूर्ण बंदीसरपंच प्रियंका ताई खेडकर व ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून कौतुक
‘पाणी कपातीसह बचतीचे उपाय करण्याची गरज’ 



देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित ’वन महोत्सव सप्ताह-2026’ अंतर्गत तिसर्‍या दिवशी गुरुवारी (दि. 3) पर्यावरण या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण, प्लास्टिकमुक्त भारत आणि हरित जीवनशैली यांसारख्या विविध सामाजिक विषयांवर आकर्षक रांगोळ्या साकारून आपल्या उत्कृष्ट कलागुणांचे प्रदर्शन केले.  या स्पर्धेसाठी प्रा. सुप्रिया ससाणे व प्रा. निकिता गायकवाड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले असून, यात शिवानी खुरे हिने प्रथम, श्रद्धा कोठुळे हिने द्वितीय, तर अनुक्षा जोगदंड हिने तृतीय क्रमांक पटकावला.  या प्रसंगी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. श्वेता वंजारे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS