Homeताज्या बातम्या

ईशा सिंहने भारताला मिळवून दिले सुवर्ण पदक; मनु भाकरच्या खात्यात कांस्य, २५ मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये भारतीय नेमबाजांची कमाल

चीन: चीनमध्ये सुरू असलेल्या शुटिंग वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी जबरदस्त कामगिरी करत देशाचा ध्वज उंच फडकावला आहे. महिलांच्या २५ मीटर पिस्टल

श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा! अयोध्येतील राममंदिर दानपेटीतील गैरव्यवहारामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप
शिक्षकाच्या आक्रोशाकडे पाठ फिरवणारा शिक्षण विभाग? सुनील मोरे यांच्या आत्महत्येने शिक्षण विभागात खळबळ
जलसंपदाशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार; मंत्री विखे पाटील यांची घोषणा, शेतकऱ्यांसाठी प्रमुख सुविधा
मनु भाकरने पाचव्या स्थानावर राहात अंतिम फेरीत पात्रता मिळवली होती. तिने 586 गुण केलं होता. तर ईशा 585 गुणांसह पात्रता फेरीत सातव्या क्रमांकावर होती. (Photo: X)

चीन: चीनमध्ये सुरू असलेल्या शुटिंग वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी जबरदस्त कामगिरी करत देशाचा ध्वज उंच फडकावला आहे. महिलांच्या २५ मीटर पिस्टल नेमबाजी प्रकारात भारताने एकाच वेळी दोन पदकांची कमाई केली असून, ईशा सिंहने सुवर्ण तर ऑलिम्पिक मेडलिस्ट मनु भाकरने कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे.

२५ मीटर पिस्टल इव्हेंटच्या अंतिम फेरीत ईशा सिंहने ५० पैकी तब्बल ४० गुण मिळवत सुवर्ण पदकावर कब्जा केला. चीनच्या यूयू झांगने ३७ गुणांसह रजत (चांदी) पदक पटकावले, तर भारताच्या मनु भाकरने अप्रतिम कामगिरी करत कांस्य पदक मिळवले.

पात्रता फेरीत मनु भाकरने ५८६ गुणांसह पाचव्या स्थानावर राहून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे, ईशा सिंहने ५८५ गुणांसह सातव्या क्रमांकावर राहत अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीत मात्र ईशाने चमकदार कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले.

ईशा सिंह गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच तिने २५ मीटर पिस्टल प्रकारात जागतिक विक्रम (World Record) नोंदवला होता. आता वर्ल्डकपमध्ये सुवर्ण पदक पटकावल्यामुळे आगामी २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून देशाच्या मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

चीनच्या हांगझाऊ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ (ISSF) वर्ल्डकप स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतीय संघ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत ६ सुवर्ण पदके जमा झाली असून, भारताला या स्थानावर पोहोचवण्यात ईशा सिंहचे मोलाचे योगदान राहिले आहे. भारताने जिंकलेल्या एकूण १४ पदकांपैकी एक सुवर्ण, दोन रजत आणि एक कांस्य अशी तब्बल चार पदके एकट्या ईशा सिंहने मिळवून दिली आहेत.

COMMENTS