Homeताज्या बातम्या

आ.विजयसिंह पंडित यांनी रस्त्याच्या कामासह नाली बांधकामाची पाहणी केलीजिथे जिथे होईल तेवढ्या जागेवर रिंग टाकून झाडे लावण्यासाठी जास्त स्कोप ठेवा, कामे क्वालिटीची करा आणि काँक्रिटीकरण झाल्यानंतर त्या कामावर पाणी मारण्यावर जास्त भर द्या अशा सुचना

आ.विजयसिंह पंडित यांनी आज दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतिर्थ) ते नगर पालिकेपर्यंत सुरू असलेल्या रस्ता आणि नाली कामाची पाहणी केली.

पर्यावरण संवर्धन हीच काळाची गरज-प्राचार्या डॉ.अश्विनी बेद्रेतुलसी महाविद्यालयात ’वन महोत्सव सप्ताह’ उत्साहात संपन्न
पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण; ४७ युवकांचे रक्तदान
मुस्लिम सेवा संघाचा स्तुत्य उपक्रमगरीब विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न



आ.विजयसिंह पंडित यांनी आज दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतिर्थ) ते नगर पालिकेपर्यंत सुरू असलेल्या रस्ता आणि नाली कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, सभापती शेख निजाम, गटनेते फारूख पटेल, नगरसेवक अशफाक इनामदार, सय्यद सादेकुजमा, खय्युम इनामदार, शेख बिलाल, वकील सर, नगरसेवक सय्यद इलियास, भागवत तावरे,बरकत पठाण, सिताई कन्स्ट्रक्शनचे रंजित क्षीरसागर, नितीन जोगदंड आदिंची उपस्थिती होती. यावेळी आ.विजयसिंह पंडित यांनी रस्त्याच्या कामासह नाली बांधकामाची पाहणी केली. जिथे जिथे होईल तेवढ्या जागेवर रिंग टाकून झाडे लावण्यासाठी जास्त स्कोप ठेवा, कामे क्वालिटीची करा आणि काँक्रिटीकरण झाल्यानंतर त्या कामावर पाणी मारण्यावर जास्त भर द्या अशा सुचना त्यांनी गुत्तेदाराला दिल्या. दरम्यान रस्त्याच्या कामाची सर्व माहिती दर्शविणारे मोठे बॅनर कामाच्या ठिकाणी लावल्याचे पाहुन आ.विजयसिंह पंडित यांनी नगर पालिकेचे कौतूक केले. प्रत्येक बाब या बॅनरवर दाखवण्यात आली आहे. नागरीकांना याची माहिती घेण्यासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS