Homeताज्या बातम्याबीड

शाँर्ट सर्किटमुळे केसर आंब्याची बाग जळुन खाकआष्टी तालुक्यातील बीड सांगवी – गणगेवाडी येथील घटना; शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान

आष्टी तालुक्यातील बीड सांगवी/गणगेवाडी येथे शेतकरी नामदेव लक्ष्मण मोहरकर यांच्या मालकीची सुमारे 1 हेक्टर क्षेत्रातील ( एकूण 100 झाडे ) केशर आंब्या

फसव्या कर्जमाफी आदेशाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळीबहुसंख्य शेतकरी राहणार वंचित असल्याचा आरोप
विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक



आष्टी तालुक्यातील बीड सांगवी/गणगेवाडी येथे शेतकरी नामदेव लक्ष्मण मोहरकर यांच्या मालकीची सुमारे 1 हेक्टर क्षेत्रातील ( एकूण 100 झाडे ) केशर आंब्याची बाग रविवारी (दि. 10 मे) दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीत पूर्णतः जळून खाक झाली. ऐन फळ काढणीच्या काळातच ही दुर्घटना घडल्याने शेतकर्‍यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोहरकर यांच्या शेतातील केशर आंब्याची बाग यंदा भरघोस फळांनी बहरून गेली होती. काही दिवसांतच आंब्यांची काढणी होणार असल्याने शेतकरी आनंदात होते. मात्र दुपारच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. उन्हाची तीव्रता आणि वार्‍याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच आगीने संपूर्ण बागेला वेढा घातला.आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र भर उन्हात भडकलेल्या आगीसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. पाहता पाहता संपूर्ण आंब्याची बाग जळून खाक झाली.या आगीत शेकडो आंब्याची झाडे, फळे तसेच सिंचनासाठीचे साहित्य जळून मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या घटनेमुळे मोहरकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS