इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी दाखवला ; रेड सिग्नल…उडाली धावपळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी दाखवला ; रेड सिग्नल…उडाली धावपळ

अहमदनगर/प्रतिनिधी : बेवारस बॅगेतील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमुळे गॅजेटवर रेड सिग्नल दाखवला गेला आणि पोलिसांची धावपळ उडाली. बँगेत नेमके काय आहे, यावर तर्क

कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा भांडाफोड लवकरच होणार
समन्यायी पाणी वाटप बाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
जिल्हा परिषद शाळा टिकणे काळाची गरज – हभप दीपक महाराज

अहमदनगर/प्रतिनिधी : बेवारस बॅगेतील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमुळे गॅजेटवर रेड सिग्नल दाखवला गेला आणि पोलिसांची धावपळ उडाली. बँगेत नेमके काय आहे, यावर तर्कवितर्क सुरू झाले. अखेर ती ताब्यात घेऊन व मोकळ्या मैदानावर नेऊन सुरक्षितपणे उघडली गेली आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला. नगरच्या बसस्थानकाजवळ बुधवारी दुपारी सापडलेल्या बेवारस बॅगेने पोलिसांसह प्रशासनाचीही धावपळ उडवली.
स्टेशन रस्त्यावरील पुणे बसस्थानक म्हणजे स्वस्तिक बस स्थानकाजवळील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाखाली बेवारस बॅग असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांची धावपळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. या पथकाने बॅगेमध्ये बॉम्बसदृश्य काही वस्तू आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्यांच्याकडे असणारे गॅजेट लावले असता त्यावर रेड सिग्नल मिळाला. त्यामुळे पुन्हा धावपळ उडाली व काहीशी घबराटही पसरली. तातडीने नगर-पुणे महामार्गावरील ट्रॅफिक दुसर्‍या रस्त्याने वळविण्यात आली व या रस्त्याची एक बाजू संपूर्णपणे मोकळी करण्यात आली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने त्यांच्याकडे असणार्‍या गॅजेटने बॅगेची पुन्हा बाहेरून तपासणी असता रेड सिग्नल कायम असल्याने या बॅगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याची शक्यता व्यक्त करीत पथकाने ही बॅग सुरक्षितपणे पोलिस मुख्यालयाच्या मोकळ्या मैदानावर आणली. तेथे पथकाकडून बॅग उघडल्यावर त्यात संशयास्पद काहीच न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. या बॅगमध्ये असलेल्या मोबाईल-घड्याळ व अन्य काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे बॉम्बशोधक पथकाच्या गॅजेटवर रेड सिग्नल दाखविला गेला असावा, असे आता पोलिसांद्वारे सांगितले जात आहे.

बॅग मालक ताब्यात
एका लष्करातील कर्मचार्‍याने ही बॅग उड्डाणपुलाखाली ठेवल्याचे समोर आले असून मद्यधुंद अवस्थेत तो उज्वल कॉमप्लेक्सजवळ पडून होता. त्याला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित बॅग ही लष्करामध्ये असणार्‍या कर्मचार्‍याची असल्यामुळे कुठलाही धोका न पत्करता लोकांच्या सुरक्षेचा विचार करून पोलिसांनी तातडीने ही बॅग ताब्यात घेतली असून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ती उघडली. त्यात संशयास्पद काहीच आढळले नसल्याने भीतीचे सावट दूर झाले असले तरी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची चौकशी सुरू केली आहे.

COMMENTS