धाराशिव: जिल्ह्यात ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिव तालुक्यातील पळ
धाराशिव: जिल्ह्यात ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिव तालुक्यातील पळसप येथे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यातील चौघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘उचलीचे पैसे परत दे, नाहीतर कामावर ये’ असा तगादा लावत आरोपींनी अल्पवयीन मुलाला मारहाण केली आणि बळजबरीने पळवून नेले. अपहरण केल्यानंतर आरोपींनी मुलाच्या आईला फोन करून ‘पैसे दे आणि मुलाला घेऊन जा, नाहीतर मुलाला सोडणार नाही’, अशी थेट धमकी दिली असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मुकादमासह बीड जिल्ह्यातील चौघांविरोधात ढोकी पोलीस ठाण्यात अपहरणासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या पैशांवरून थेट अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून ढोकी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS