बीड :- येथील महिला कला महाविद्यालयात दिनविशेष समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य

बीड :- येथील महिला कला महाविद्यालयात दिनविशेष समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या आयस्कर होत्या. यावेळी दिनविशेष समिती प्रमुख डॉ. वर्षा कुलकर्णी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बबन बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ. संध्या आयस्कर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजातील श्रमिक, वंचित आणि सामान्य माणसांच्या जीवनाला आवाज दिला. सामाजिक समता व समाजजागृतीसाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या कादंबर्या व साहित्य आजही समाजाला प्रेरणा देतात. तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा उल्लेख करत त्यांनी राष्ट्रप्रेम, शिक्षण आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश प्रत्येकाने जीवनात आत्मसात करावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बबन बोबडे यांनी मानले.

COMMENTS