Homeताज्या बातम्या

डॉ. आंबी ‘महा ऍक्युपंक्चर रत्न’ पुरस्काराने सन्मानित

अकोले  : येथील जेष्ठ  ऍक्युपंक्चरीस्ट प्राध्यापक डॉ. विष्णू गणपती आंबी यांना आयुष इंटरनेशनल मेडीकल असोसिएशन यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “महा  ऍक्युपंक्चर रत्न पुरस्कार २०२६” देऊन गौरविण्यात आले. ऍक्युपंक्चर उपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, अध्ययन, प्रचार, प्रसार, रुग्णसेवा तसेच सामाजिक व समाजउपयोगी योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.रविवारी  (दि.१९) जुलै २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाटयगृह, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळयात मान्यवरांचे हस्ते डॉ. विष्णू आंबी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठीयावेळी डॉ. बाबुराव कानडे (राष्ट्रीय अध्यक्ष आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन),डॉ. नितीनराजे पाटील( व्हा.चेअरमन,आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन), अध्यक्ष डॉ. सतिश कराळे,कार्यकारिणी सदस्य डॉ. अभिजीत कवठकर उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल त्यांच्या मातोश्री गंगुबाई शिंदे,  ऍक्युपंक्चर मेडिकल कॉलेजचे  डॉ. अनिल रहाणे, अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी तसेच अकोले तालुका मेडिकल असोशिएशनने त्यांचे अभिनंदन केले.डॉ. विष्णू गणपती आंबी हे १९८० पासून अॅक्युपंक्चर उपचार पध्दतीद्वारे असंख्य रूग्णांना आरोग्यदायी जीवन देण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील चिपळूण, पुणे, इगतपुरी, संगमनेर, अकोले आदी परिसरातील रूग्णांना अॅक्युपंक्चर उपचार पध्दतीद्वारे सेवा दिली आहे.

वाघापूरला महिलेवर बिबट्याचा हल्ला
मतदार पडताळणीसाठी बीएलओंनी घरोघरी जावेग्राहक पंचायतची मागणी
‘देशमुख’ महाविद्यालयात कुस्ती मल्लांची निवड चाचणी

COMMENTS