अहिल्यानगर/पुणे : महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी अखेरचा दिवस होता. या दिवशी बारामती मतदारसंघ

अहिल्यानगर/पुणे : महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी अखेरचा दिवस होता. या दिवशी बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँगे्रसकडून अर्थात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी तर त्यांच्या विरोधात काँगे्रसचे उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुरीतून भाजपकडून अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांचे कडवे विरोधात प्राजक्त पवार यांनी माघार घेतली असली तरी, शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार रवी मोरे यांनी अपक्ष तर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंदराव मोकाटे यांनी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची 9 एप्रिल असून या दिवशीच बारामती आणि राहुरी मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्यातरी या दोन्ही मतदारसंघामध्ये निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळत आहे. मात्र उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी बहुतांश उमेदवार माघार घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बारामती मतदारसंघातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतल्यामुळे तसेच काँगेसचे उमेदवार आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ येणार होते, मात्र त्यांनी ऐनवेळी हा दौरा रद्द केल्यामुळे मोरे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अर्ज दाखल केला. यावेळी आकाश मोरे यांचे वडील विठ्ठलराव मोरे यांनी थेट खा. शरद पवारांवर टीका केली, तसेेच आकाश मोरे यांनी अजितदादांच्या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करा, मी माझा उमेदवारी अर्ज माघार घेतो, असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँगे्रसला दिल्यामुळे बारामती निवडणूक होणार की, मोरे माघार घेणार हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल
तनपुरेंना भाजपचा नेमका कोणता शब्द ?
राष्ट्रवादी काँगे्रस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्यामुळे आणि त्यांनी बंद दाराआड भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा करत थेट मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे तनपुरे यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे. तनपुरे यांना भाजपने नेमका कोणता शब्द दिला, त्याचे उत्तर अनुत्तरितच आहे.
बारामतीची सेवा म्हणजे पांडूरंगाची सेवा : सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात चांगल्याच भावुक झाल्या. बारामतीची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे. अजितदादांचे हे विचार होते. त्यांच्यानंतर मी माझे दुःख तळघरात कोंडून तुमच्या सेवेसाठी पुढे आले आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या.
राष्ट्रवादीच्या बॅनरवर माझा फोटो वापरणे चुकीचे : खा. पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आयोजित केलेल्या सभेत पक्षाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह शरद पवार यांचाही फोटो होता. याबाबत शरद पवार यांनी आपला फोटो वापरणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही शरद पवार यांनी पडदा टाकला.


COMMENTS