नाळवंडी : नाळवंडी येथे होणारी ग्रामपंचायत पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मयत ग्रामपंचायत सदस्य स्व. संतोष राऊत यांच्या रिक्त झाल

नाळवंडी : नाळवंडी येथे होणारी ग्रामपंचायत पोटनिवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मयत ग्रामपंचायत सदस्य स्व. संतोष राऊत यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत असून, परिसरात राजकीय वातावरण तापले आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाळवंडी गावात भ्रष्टाचार आणि अपहाराच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, या प्रश्नांवर ठोसपणे आवाज उठवणारे आणि प्रशासनाला जाब विचारणारे नेतृत्व गावात नसल्याची खंत चर्मकार समाजाचे नेते तथा भावी पंचायत समिती सदस्य आत्माराम सोनवणे यांनी व्यक्त केली. वार्ड क्रमांक 3 मधील जनतेला संबोधित करताना त्यांनी राघू भैया राऊत यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. राघू राऊत यांच्या रूपाने जनतेला प्रश्न विचारणारा आणि भ्रष्टाचाराविरोधात बंड पुकारणारा सक्षम उमेदवार मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले. राघू भैया राऊत हे दूरदृष्टी असलेले, संयमी आणि विकासाभिमुख व्यक्तिमत्व असून ते निवडून आल्यास नाळवंडी गावासह संपूर्ण वार्डचा सर्वांगीण विकास साधतील, असा विश्वासही आत्माराम सोनवणे यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत नागरिकांनी छत्री या चिन्हासमोरील बटन दाबून राघू राऊत यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

COMMENTS