Homeताज्या बातम्या

श्रीगोंदा तहसीलसमोर कर्जमाफीविरोधात निदर्शने  

श्रीगोंदा : राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शेतकरी, विविध सामाजिक संघटना आणि स

तामसा परिसरातील शेतकरी पिकविमा रकमेच्या प्रतीक्षेत; प्रशासनाविरोधात संताप
मोदी सरकारच्या प्रस्तावित ऊस नियंत्रण  आदेशाला शेतकरी संघटनेचा विरोध
शाँर्ट सर्किटमुळे केसर आंब्याची बाग जळुन खाकआष्टी तालुक्यातील बीड सांगवी – गणगेवाडी येथील घटना; शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान


श्रीगोंदा : राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शेतकरी, विविध सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध आंदोलन करत शासनाच्या धोरणाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी शासनाच्या कर्जमाफी आदेशाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. तसेच कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत नव्याने जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेतील अटी व निकषांवर आक्षेप घेतला. सन २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या योजनेत समाविष्ट करावे, पीक कर्जासह मध्य मुदत व इतर सर्व प्रकारच्या कृषी कर्जांचा कर्जमाफीमध्ये समावेश करावा तसेच आजी-माजी सैनिक शेतकऱ्यांनाही लाभ द्यावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी बोलताना शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी शासनाच्या कर्जमाफी धोरणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात जाहीर झालेल्या कर्जमाफीमध्ये अनेक अटी व निकष घालण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. ही कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी फसवी योजना आहे. शासनाने कर्जमाफीची आशा दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केली असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील.” तालुक्यातील सर्वपक्षीय व सामाजिक घटकांना एकत्र घेऊन कर्जमाफीचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी राजेंद्र म्हस्के यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शेवटपर्यंत साथ देण्याची ग्वाही दिली. संघर्ष क्रांती संघटनेचे प्रशांत दरेकर यांनी सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत एकजुटीने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
 या आंदोलनात राजेंद्र म्हस्के, अनिल घनवट, मारुती भापकर, प्रशांत दरेकर, एकनाथ आळेकर, अरविंद कापसे, हेमंत नलगे, भाऊसाहेब नेटके, भास्कर वागस्कर, मुकुंद सोनटक्के, अनिल ठवाळ, राजेंद्र नागवडे, डॉ. कोकाटे, गंगाराम दरेकर, रूपेश इथापे, रामभाऊ गुणवरे, रघुनाथ सूर्यवंशी, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर खेतमाळीस, महादेव म्हस्के यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.  

COMMENTS