Homeताज्या बातम्या

ढवळपुरीतील युवकाला दांडक्याने जबर मारहाण; पोलिसांनी दखल न घेतल्याचा सांगळे कुटुंबाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

पारनेर: तालुक्यातील ढवळपुरी येथील सुतारवाडी परिसरातील बाळू सखाराम सांगळे (वय 40) या युवकाला लाथाबुक्क्यांनी तसेच दांडक्याने जबर मारहाण झाल्याची घ

राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रकल्पाला हायकोर्टाचा ब्रेक! शेतकऱ्यांच्या रिट याचिकेची दखल; आठवडाभरात भूमिका स्पष्ट करण्याचे शासनास आदेश
अहमद इनामदार यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात  
वीजबिल शून्यावर आणणारा विद्यार्थ्यांचा सोलर प्रोजेक्ट !सोनिया गांधी पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
Jalgaon : जुन्या वादातून मुलास बेदम मारहाण

पारनेर: तालुक्यातील ढवळपुरी येथील सुतारवाडी परिसरातील बाळू सखाराम सांगळे (वय 40) या युवकाला लाथाबुक्क्यांनी तसेच दांडक्याने जबर मारहाण झाल्याची घटना मंगळवार, दि. 4 ऑगस्ट रोजी घडली. या मारहाणीत बाळू सांगळे यांच्या हाताला गंभीर दुखापत होऊन हात फ्रॅक्चर झाला असून, पाठीवर मारहाणीचे मोठे व्रण असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणात संबंधित व्यक्तींविरुद्ध तक्रार करूनही पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोप बाळू सांगळे व त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. बाळू सांगळे यांनी दि. 25 जुलै रोजी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, या तक्रारीची अपेक्षित दखल घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे सांगळे कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाण्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तक्रारदाराच्या तक्रारीची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

COMMENTS