Homeताज्या बातम्या

तामसा येथे डेंग्यूसदृश्य आजाराने चार वर्षीय बालकाचा मृत्यू; शहरात भीतीचे वातावरण

तामसा (प्रतिनिधी) : तामसा शहरात डेंग्यूसदृश्य आजाराने चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 6 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेमुळे शहरात भीतीच

महिला जवानांच्या तत्परतेने प्रवाशाचे प्राण वाचले
सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातसर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता ; 20 वर्षांनंतर न्यायालयाचा निर्णय
डेंग्यूसदृश आजाराने बालकाचा मृत्यू - Marathi News | Child Deaths Due To  Dengue - Latest Maharashtra News at Loksatta.com

तामसा (प्रतिनिधी) : तामसा शहरात डेंग्यूसदृश्य आजाराने चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 6 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मृत बालकाचे नाव शुभम रुपेश कोरे (वय 4) असे असून तो तामसा येथील प्रभाग क्रमांक 5 मधील रहिवासी होता. मागील चार ते पाच दिवसांपासून त्याला तीव्र ताप होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्रकृती अचानक खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.

शुभम हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकाली निधनाने कोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, हा मृत्यू डेंग्यूसदृश्य आजारामुळे झाल्याचे सांगितले जात असले तरी याबाबत आरोग्य विभागाकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने विशेष वैद्यकीय पथक तैनात करून घरोघरी आरोग्य तपासणी करावी, शहरात डासप्रतिबंधक औषधांची फवारणी व धूर फवारणी मोहीम राबवावी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS