Homeताज्या बातम्या

एप्रिल मे महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दोन कोटींची नुकसान भरपाई : आ. काळे

   कोपरगाव : तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत तातडीने पंचनामे करण्याच्या सू

अवकाळी पावसाने विटभट्टी व्यवसाय उद्ध्वस्त; संगमनेरमध्ये नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी
१९५० नंतरचा सर्वाधिक तीव्र ‘एल निनो’ सक्रिय; मान्सूनवर संकटाची छाया, दुष्काळाची भीती वाढली
अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्याला तडाखा; नांदला-दिग्रस परिसरात केळी बागांचे मोठे नुकसान

 
  कोपरगाव : तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून महायुती शासनाने कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १.८० कोटी नुकसानभरपाई जाहीर केली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
  नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजली असून एपिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. या अवकाळी पावसामुळे अनेक शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेकडो हेक्टरवरील काढणीला आलेल्या पिकांसह डाळिंब, टरबूज आदीसह फळबागांचे, चारा पिकांचे आणि कांदा काढून झाकून ठेवलेल्या कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी आणखी आर्थिक अडचणीत सापडला होता.
 शेतकरी आलेल्या नैसर्गिक संकटाला न घाबरता नेहमीच मोठ्या हिमतीने उभा राहिला आहे.त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळविता येईल यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १.८० कोटी नुकसान भरपाई रक्कम मंजूर केली आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामाच्या तयारीसाठी मदत होणार आहे.

COMMENTS