Homeताज्या बातम्या

तीन वर्षांपासून फरार असलेले ‘बॅग लिफ्टिंग’ प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद; 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन वर्षांपूर्वी घडलेल्या बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत तीन फरार

कोतवाली पोलिसांवर सूराधारी तरुणाची दहशत
राजधानीत गाठला कू्ररतेचा कळस
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन वर्षांपूर्वी घडलेल्या बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत तीन फरार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे 13 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट 2023 रोजी फिर्यादी प्रशांत प्रभाकर डहाळे (रा. सिडको, नांदेड) यांच्या बॅगेची चोरी करून त्यातील सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान ऐवज लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 561/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 379 अन्वये दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान यापूर्वी दोन आरोपींना अटक करून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र, उर्वरित तीन आरोपी तीन वर्षांपासून फरार होते.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध राज्यांमध्ये शोधमोहीम राबवून आरोपींचा माग काढण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने तेलंगणातील बासर परिसरात सापळा रचून औला गंगा औला रामुल (वय 40), कंचना दास येशुदास (वय 40) आणि चिनबाबू रामू प्रधान (वय 23, सर्व रा. जाजपूर, ओडिशा) या तीन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून सुमारे 13 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी व सायबर सेलच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

COMMENTS