Homeव्हिडीओ

धुळे जिल्ह्यात कापूस पीकविमा रखडला; सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शिरपूर फर्स्टचे अनोखे आंदोलन

https://youtu.be/cV2gwDd2pJg धुळे जिल्ह्यात २०२५ च्या खरीप हंगामात PM फसल विमा योजनेअंतर्गत कापूस पिकाचा विमा अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप मिळा

श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान
मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरपुढील दोन-तीन दिवसांत आगमनाची शक्यता
कृषीसाहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसर्‍यांदा मनमोहन कलंत्री बिनविरोधजिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने सत्कार

धुळे जिल्ह्यात २०२५ च्या खरीप हंगामात PM फसल विमा योजनेअंतर्गत कापूस पिकाचा विमा अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नसल्याचा आरोप करत, तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात आसूड घेतला आणि गळ्यात फाशीचा दोर घालून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त केला. यावेळी उपजिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली होती. मात्र, पीकविमा काढूनही अनेक शेतकरी आजपर्यंत विमा भरपाईपासून वंचित आहेत. त्यामुळे आर्थिक संकट अधिक गडद झाले असून, शासनाने तात्काळ पीकविमा वितरित करावा आणि राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास येत्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल. यावेळी शिरपूर फर्स्ट, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS