Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीएसएनएलची सेवा सुरळीत न झाल्यास आंदोलन : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे

पाथर्डी : माणिकदौंडी परिसरामध्ये या सरकारी मोबाईल कंपनीची रेंज सेवा मिळत नसल्याने टॉवर व मशिनरी दुरुस्ती करून रेंज सेवा नियमित व सुरळीत करा अशी बीएसएनएल चे उपमंडल अभियंता यांच्याकडे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आजच्या काळात संपर्कासाठी मोबाईल पेक्षा जलद कोणतीही गोष्ट नाही माणिकदौंडी भागात बीएसएनएलचे टॉवर आहेत; परंतु रेंज नियमित मिळत नाही अशी परिस्थिती आहे. माणिकदौंडी, पिरेवाडी, जगसोंड तांडा, आल्हणवाडी, बोरसेवाडी, घुमटवाडी, चितळवाडी, पत्र्याचा तांडा, धनगरवाडी या ठिकाणी टॉवर असून देखील रेंज नियमित मिळत नसल्याने या भागातील नागरिकांना शिष्याला परवडणाऱ्या सरकारी कंपनीच्या सेवेपासून वंचित राहून महागड्या इतर कंपन्यांची सेवा नाईलाजाने घ्यावी लागते. बीएसएनएलची कृषी कार्ड १४१ रुपये तर साधारण रिचार्ज १४७ रुपयात महिनाभर सेवा मिळते. हीच सेवा खाजगी कंपन्यांच्या रिचार्ज साठी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागतात ज्यांच्याकडे फक्त बीएसएनएलचे कार्ड आहे. त्या नागरिकांना एकमेकांशी संपर्क करण्यास अडचण येत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

शासनाच्या विविध योजनां ह्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महा राजस्व अभियान
‘निळवंडे’च्या शेजारील पिंपरकणे गावात पाणी टंचाई; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
प्रामाणिक विद्यार्थ्यांना परिस्थिती आडवी येत नाही : ढोले  

COMMENTS