Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रामाणिक विद्यार्थ्यांना परिस्थिती आडवी येत नाही : ढोले  

पाथर्डी : आयुष्यात फक्त आई -वडील आणि शिक्षकच मोफत मार्गदर्शन करू शकतात. शिक्षक जे शिकवतात विद्यार्थ्यांनी ऐकून कृतीत उतरवणे महत्त्वाचे आहे. प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती कधी आडवी येत नाही. विद्यार्थी जीवनातील दहावी,अकरावी व बारावी ही तीन वर्ष जीवनाला कलाटणी देणारे आहेत असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ बाल विद्या मंदिरचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले यांनी केले. ते बाबूजी आव्हाड कनिष्ठ  महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत एमएच-सीईटी क्रॅश चे आयोजन करण्यात आले त्यावेळी बोलत होते. सलग दुसऱ्या वर्षी या मोफत अभ्यासक्रमाचे सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती.प्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व सीईटी साठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी साक्षी सांगळे, म्हस्के सानिका, सानप आदित्य, ठेंगल कृष्णा या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. पालक प्रतिनिधी म्हणून रुपनर राधाकृष्ण हेही उपस्थित होते. महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.सलीम शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद व एमएचसीइटीचे समन्वयक सुधीर सुडके आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणिता भावसार यांनी केले तर आश्विनी एडके यांनी आभार मानले.

जायकवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना लवकरच सुरू होणार; आमदार मोनिका राजळे यांच्याकडून कामाची पाहणी
साहित्यिक चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरज – अभय आव्हाड
तनपुरवाडी येथील नदीचे लोकवर्गणीतून खोलीकरण; सरकारी मदतीशिवाय ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम

पाथर्डी : आयुष्यात फक्त आई -वडील आणि शिक्षकच मोफत मार्गदर्शन करू शकतात. शिक्षक जे शिकवतात विद्यार्थ्यांनी ऐकून कृतीत उतरवणे महत्त्वाचे आहे. प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिस्थिती कधी आडवी येत नाही. विद्यार्थी जीवनातील दहावी,अकरावी व बारावी ही तीन वर्ष जीवनाला कलाटणी देणारे आहेत असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ बाल विद्या मंदिरचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले यांनी केले.

ते बाबूजी आव्हाड कनिष्ठ  महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत एमएच-सीईटी क्रॅश चे आयोजन करण्यात आले त्यावेळी बोलत होते. सलग दुसऱ्या वर्षी या मोफत अभ्यासक्रमाचे सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती.प्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व सीईटी साठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी साक्षी सांगळे, म्हस्के सानिका, सानप आदित्य, ठेंगल कृष्णा या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. पालक प्रतिनिधी म्हणून रुपनर राधाकृष्ण हेही उपस्थित होते. महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.सलीम शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद व एमएचसीइटीचे समन्वयक सुधीर सुडके आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणिता भावसार यांनी केले तर आश्विनी एडके यांनी आभार मानले.

COMMENTS