Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘निळवंडे’च्या शेजारील पिंपरकणे गावात पाणी टंचाई; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

अकोले : तालुक्यातील पिंपरकणे येथील ग्रामपंचायत कार्यालयास तळेवाडीच्या संतप्त महिलांनी शुक्रवारी टाळे ठोकले. यावेळी ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्य यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या नागरिकांना पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्वांची सुटका करण्यात आली. निळवंडे जलाशयाच्या काठावर आढळवाडी, डोंगरवाडी, तळेवाडी अशा तीन वाडीवस्त्यांसह पिंपरकणे गाव आहे.त्यापैकी तळेवाडी येथील नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शाश्वत पाण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे येथील महिलांवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. पाणी समस्येबाबत ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला निवेदने दिले अर्ज, विनंत्या करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या तळेवाडीच्या महिलांनी शुक्रवारी पिंपरकणे ग्रामपंचायत कार्यालयास टाळे लावून आंदोलन केले. नागरिकांमधील संताप वाढत गेला. याचे पडसाद शुक्रवारी मंदिरात आयोजित ग्रामसभेत उमटले. तळेवाडी येथील महिलांनी रिकामे हांडे घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. आक्रमक झालेल्या महिलांनी घोषणाबाजी करीत ग्रामसभा सुरू असल्याने मंदिराला व नंतर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना कोंडले. तीन वर्षांपासून वारंवार मागणी करून लक्ष दिले जात नाही. धरण उशाला असूनही पाणी मिळत नाही. आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कुलूप लावून कोंडल्याचे महिलांनी सांगितले. सुमारे दीड-दोन तास हा गोंधळ सुरू होता. अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने तळेवाडीला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

किसनराव देशमुख यांचे निधन
कोकणवाडी येथे जाधव भावकीचा स्नेह मेळावा उत्साहात
ब्राह्मणवाडा येथील ब्रिटिशकालीन विश्रामागृह वणव्यात खाक

अकोले : तालुक्यातील पिंपरकणे येथील ग्रामपंचायत कार्यालयास तळेवाडीच्या संतप्त महिलांनी शुक्रवारी टाळे ठोकले. यावेळी ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्य यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या नागरिकांना पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्वांची सुटका करण्यात आली. निळवंडे जलाशयाच्या काठावर आढळवाडी, डोंगरवाडी, तळेवाडी अशा तीन वाडीवस्त्यांसह पिंपरकणे गाव आहे.त्यापैकी तळेवाडी येथील नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शाश्वत पाण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे येथील महिलांवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ

आली आहे. पाणी समस्येबाबत ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला निवेदने दिले अर्ज, विनंत्या करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या तळेवाडीच्या महिलांनी शुक्रवारी पिंपरकणे ग्रामपंचायत कार्यालयास टाळे लावून आंदोलन केले. नागरिकांमधील संताप वाढत गेला. याचे पडसाद शुक्रवारी मंदिरात आयोजित ग्रामसभेत उमटले. तळेवाडी येथील

महिलांनी रिकामे हांडे घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. आक्रमक झालेल्या महिलांनी घोषणाबाजी करीत ग्रामसभा सुरू असल्याने मंदिराला व नंतर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना कोंडले. तीन वर्षांपासून वारंवार मागणी करून लक्ष दिले जात नाही. धरण उशाला असूनही पाणी मिळत नाही. आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कुलूप लावून कोंडल्याचे महिलांनी सांगितले. सुमारे दीड-दोन तास हा गोंधळ सुरू होता. अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने तळेवाडीला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

COMMENTS