श्रीगोंदा : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण श्रीगोंदा येथील शारदा विद्या निकेतनच्या एन. एस. गुळवे ज्युनिअर कॉलेजमधील कला शाखेतील प्रिया मल्हारी शिंदे हिने घालून दिले आहे. बारावीच्या फेब्रुवारी २०२६ च्या बोर्ड परीक्षेपूर्वीच वडिलांचे निधन होऊन मोठा आघात सहन करावा लागला असतानाही प्रियाने खंबीरपणे परीक्षेला सामोरे जात कॉलेजमध्ये दुसरा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. प्रियाच्या आयुष्यातील हा काळ अत्यंत कठीण होता. वडिलांचे छत्र हरपल्यामुळे मानसिक आणि भावनिक धक्का बसलेला असतानाही तिने हार न मानता शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. तिच्या या संघर्षमय प्रवासात कॉलेजमधील शिक्षकवर्गाने दिलेला मानसिक आधार मोलाचा ठरला. याच आधारामुळे तिने स्वतःला सावरत परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रियाच्या या यशामुळे परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या जिद्दीची आणि मेहनतीची दखल घेतली जात आहे. तिची ही प्रेरणादायी कथा अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिपक होनराव यांनी तिचा विशेष सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा प्राचार्य बी. टी. मखरे, कॉलेज विभाग प्रमुख प्रा. कांचनताई कुरुमकर, प्रा. प्राजक्ता होनराव, प्रा. सचिन जगदाळे, प्रा. राम सोनवणे, गणेश लंगोटे आदी मान्यवर उपस्थित होते. “पेपर सुरू होण्यापूर्वी वडिलांचे निधन झाले. ही खूप मोठी दुःखद घटना होती. मात्र संस्था अध्यक्ष प्रा. दीपक होनराव, प्राचार्य बी. टी. मखरे आणि सर्व प्राध्यापकांनी मला मानसिक आधार दिला. त्यामुळेच मी परीक्षेत यश मिळवू शकले. या यशाचे पूर्ण श्रेय मी माझ्या कॉलेजला देते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना घडविणारे हे एकमेव कॉलेज आहे. – प्रिया मल्हारी शिंदे, पिसोरे खांड.

श्रीगोंदा : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन करता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण श्रीगोंदा येथील शारदा विद्या निकेतनच्या एन. एस. गुळवे ज्युनिअर कॉलेजमधील कला शाखेतील प्रिया मल्हारी शिंदे हिने घालून दिले आहे. बारावीच्या फेब्रुवारी २०२६ च्या बोर्ड परीक्षेपूर्वीच वडिलांचे निधन होऊन मोठा आघात सहन करावा लागला असतानाही प्रियाने खंबीरपणे परीक्षेला सामोरे जात कॉलेजमध्ये दुसरा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
प्रियाच्या आयुष्यातील हा काळ अत्यंत कठीण होता. वडिलांचे छत्र हरपल्यामुळे मानसिक आणि भावनिक धक्का बसलेला असतानाही तिने हार न मानता शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. तिच्या या संघर्षमय प्रवासात कॉलेजमधील शिक्षकवर्गाने दिलेला मानसिक आधार मोलाचा ठरला. याच आधारामुळे तिने स्वतःला सावरत परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली.
प्रियाच्या या यशामुळे परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या जिद्दीची आणि मेहनतीची दखल घेतली जात आहे. तिची ही प्रेरणादायी कथा अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिपक होनराव यांनी तिचा विशेष सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीगोंदा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा प्राचार्य बी. टी. मखरे, कॉलेज विभाग प्रमुख प्रा. कांचनताई कुरुमकर, प्रा. प्राजक्ता होनराव, प्रा. सचिन जगदाळे, प्रा. राम सोनवणे, गणेश लंगोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
“पेपर सुरू होण्यापूर्वी वडिलांचे निधन झाले. ही खूप मोठी दुःखद घटना होती. मात्र संस्था अध्यक्ष प्रा. दीपक होनराव, प्राचार्य बी. टी. मखरे आणि सर्व प्राध्यापकांनी मला मानसिक आधार दिला. त्यामुळेच मी परीक्षेत यश मिळवू शकले. या यशाचे पूर्ण श्रेय मी माझ्या कॉलेजला देते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना घडविणारे हे एकमेव कॉलेज आहे.
– प्रिया मल्हारी शिंदे, पिसोरे खांड.

COMMENTS