राहाता : महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटना, पुणे यांच्या वतीने राहाता येथे शारदा विद्या मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस रमेश शिंदे अध्यक्षस्थानी होते. बैठकीस संघटनेचे कार्याध्यक्ष व सहसचिव मनोहर पोकळे, वित्त विभागाचे निवृत्त उपसंचालक बी. जी. निर्मळ, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त निवृत्त मुख्याध्यापक सर्जेराव मते, पंढरीनाथ काकडे, जी. टी. गमे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोहर पोकळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या कृतिशील व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्या दीर्घ अनुभवाचा लाभ समाजाला मिळावा, तसेच त्यांच्या आरोग्य आणि सक्रियतेसाठी ते कार्यरत राहावेत, या उद्देशाने संघटना कार्यरत आहे. संघटनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये काम सुरू झाले आहे. निवृत्तीवेतनधारकांचे प्रश्न सोडविणे, त्यांच्या सुरक्षिततेची व स्वास्थ्याची काळजी घेणे यावर संघटना प्राधान्याने काम करत आहे. जगातील केवळ १.२५ टक्के लोकांनाच निवृत्तीवेतन मिळते, तर अनेक देशांत निवृत्तीवेतन योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवृत्तांनी आपल्या हक्कांसाठी संघटीत होणे आवश्यक असल्याचेही पोकळे यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात रमेश शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघटनेचे महत्त्व अधोरेखित करत शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याची सूचना मांडली. प्रास्ताविक सर्जेराव मते यांनी केले, तर सूत्रसंचालनही त्यांनीच केले. आभार प्रदर्शन जी. टी. गमे यांनी केले. या बैठकीस एस. टी. घुले, एस. के. थोरात, भास्कर झावरे, बाळासाहेब निर्मळ, मनोहर बोरुडे, नामदेव गाडेकर, नानासाहेब नळे, हरिश्चंद्र चौधरी, नानासाहेब गाडेकर, मंडलिक शिलेदार, शिवमूर्ती गोसावी, भिवसेन गाडेकर, भाऊसाहेब मेहेत्रे, माधव घाडगे, रेवणनाथ बनकर यांच्यासह निवृत्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राहाता : महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटना, पुणे यांच्या वतीने राहाता येथे शारदा विद्या मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस रमेश शिंदे अध्यक्षस्थानी होते.
बैठकीस संघटनेचे कार्याध्यक्ष व सहसचिव मनोहर पोकळे, वित्त विभागाचे निवृत्त उपसंचालक बी. जी. निर्मळ, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त निवृत्त मुख्याध्यापक सर्जेराव मते, पंढरीनाथ काकडे, जी. टी. गमे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोहर पोकळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या कृतिशील व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्या दीर्घ अनुभवाचा लाभ समाजाला मिळावा, तसेच त्यांच्या आरोग्य आणि सक्रियतेसाठी ते कार्यरत राहावेत, या उद्देशाने संघटना कार्यरत आहे. संघटनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये काम सुरू झाले आहे. निवृत्तीवेतनधारकांचे प्रश्न सोडविणे, त्यांच्या सुरक्षिततेची व स्वास्थ्याची काळजी घेणे यावर संघटना प्राधान्याने काम करत आहे.
जगातील केवळ १.२५ टक्के लोकांनाच निवृत्तीवेतन मिळते, तर अनेक देशांत निवृत्तीवेतन योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवृत्तांनी आपल्या हक्कांसाठी संघटीत होणे आवश्यक असल्याचेही पोकळे यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात रमेश शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघटनेचे महत्त्व अधोरेखित करत शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याची सूचना मांडली. प्रास्ताविक सर्जेराव मते यांनी केले, तर सूत्रसंचालनही त्यांनीच केले. आभार प्रदर्शन जी. टी. गमे यांनी केले.
या बैठकीस एस. टी. घुले, एस. के. थोरात, भास्कर झावरे, बाळासाहेब निर्मळ, मनोहर बोरुडे, नामदेव गाडेकर, नानासाहेब नळे, हरिश्चंद्र चौधरी, नानासाहेब गाडेकर, मंडलिक शिलेदार, शिवमूर्ती गोसावी, भिवसेन गाडेकर, भाऊसाहेब मेहेत्रे, माधव घाडगे, रेवणनाथ बनकर यांच्यासह निवृत्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS