Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार आत्रताप्रकरणी नार्वेकरांना सर्वोच्च नोटीस

उत्तर देण्यासाठी दिला दोन आठवड्यांचा अवधी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राज्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा नव्या वळणावर येवून ठेपला आहे. शिवसेनेतून बंड करून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर एक वर्षांचा

आमदार अपात्रता निकालाबाबत नार्वेकरांना सर्वोच्च नोटीस
 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
अपात्रतेचा निर्णय नियमांनुसारच होईल

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राज्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा नव्या वळणावर येवून ठेपला आहे. शिवसेनेतून बंड करून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर एक वर्षांचा कालावधी लोटला असला तरी, आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा फैसला झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर याचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आली होती. मात्र त्यांनी याप्रकरणी अजूनही निर्णय घेतलेला नाही. याविरोधात सुनावणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात पार पडली, यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली. कोर्टाने नार्वेकरांना अवघ्या 2 आठवड्यांत या नोटीसीवर आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
विधानसभा अध्यक्षांनी निर्णय न घेतल्याने ठाकरे गटाची विधानसभा अध्यक्षांविरोधात ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अध्यक्षांना तातडीने निर्णय घ्यावा, अशी याचिकेत विनंती करण्यात आली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या आणखी 15 आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे या आमदारांना पात्र ठरवण्यात येते की, अपात्र ठरवण्यात येते, याचा सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. याबाबत राहुल नार्वेकर म्हणाले की, मला खात्री आहे. मी ज्या सभागृहाचे नेतृत्व करतो. घटनेत दिलेल्या तरतुदींप्रमाणे असेल. नियमानुसार निर्णय घेण्यात येईल. सर्व बाबींचा विचार करावा लागेल. राजकीय पक्षाचे नेतृत्व कोण करत होते. याचिकेत काय म्हटले आहे, आदी बाबी तपासल्या जातील. निर्णय काय घेणार हे आत्ताच सांगितले तर जनतेवर अन्याय. तडकाफडकी निर्णय घेतला तर म्हणतील की अध्यक्षांनी दबावात निर्णय घेतला. नार्वेकर यांनी म्हटले होते की, मी निर्णय घेतल्यानंतर न्यायालय निर्णय घेऊ शकते, परंतु न्यायालय सभापतींना आदेश देऊन ठराविक मुदतीत निर्णय घेण्यास भाग पाडू शकत नाही. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी किती वेळ लागेल या बाबत नार्वेकर म्हणाले होते की, महाराष्ट्रात जे घडले ते अभूतपूर्व आहे. माझ्याकडे अशा घटनेचे इतर कोणत्याही राज्यातील उदाहरण नाही. त्यामुळे अशा प्रकरणाचा निर्णय कसा घ्यायचा हे माझ्यासाठी गुंतागुंतीचे आणि महत्त्वाचे आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांना उत्तर देण्यासाठी आणखी वेळ मागणारी याचिका आल्यास त्या विनंतीच्या आधारे त्यावर निर्णय घेऊ, असे नार्वेकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असं सूचक वक्तव्य नार्वेकरांनी केले होते. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. महाराष्ट्राच्या या केसच्या सुनावणीदरम्यान अध्यक्षांकडे निर्णय देताना कालमर्यादा असावी की नाही यावरही युक्तीवाद झाले होते.

आधी निर्णय होणार खरी शिवसेना कुणाची – आमदार पात्र-अपात्रतेचा निर्णय घेण्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर खरी शिवसेना नेमकी कुणाची, यावर निर्णय घेणार आहेत, त्यानंतर ते आमदारांना पात्र-अपात्र ठरवतील. तसे बघितल्यास निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हटले आहे. असे असतांना, पुन्हा निवडणूक आयोगाकडून पक्षाची घटना मागवून घेवून, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली शक्यता आहे, तसेच गरज भासल्यास दोन्ही नेत्यांची उलटतपासणीही घेतली जाईल. तसेच दोन्ही गटांना पुरावेही सादर करावे लागणार आहेत, त्यामुळे ही प्रक्रिया अजूनही लवकर पार पडण्याची शक्यता दिसत नाही.

COMMENTS