Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमचे विचार वेगळे, मात्र थोरातांसोबत मैत्री कायम ; राज्यपाल डॉ.हरिभाऊ बागडे ; राजहंस दूध संघाला भेट

संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि मी 1985 ला सोबतच विधानसभेमध्ये गेलो. आमचे विचार वेगळे, मात्र मैत्री कायम राहिली. अत्यंत सरळ, सुस्वाभावी

नसरापूर दुर्घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये कॅण्डल मार्च
शेतकऱ्यांनी त्यांचे सातबारे जिवंत करून घ्यावेत; प्रांताधिकारी नितीन पाटील; कर्जतमध्ये ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात
प्रीता शेजवळ राज्यस्तरीय संगीत महोत्सवात प्रथम

संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि मी 1985 ला सोबतच विधानसभेमध्ये गेलो. आमचे विचार वेगळे, मात्र मैत्री कायम राहिली. अत्यंत सरळ, सुस्वाभावी आणि शांत असणारे बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन काम केले. कधीही भेदभाव केला नाही. सततच्या विकास कामांमधून तालुक्यामध्ये समृद्धी निर्माण केली असल्याचे गौरवउद्गार राजस्थानचे राज्यपाल डॉ.हरिभाऊ बागडे यांनी काढले.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा दूध संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा.चेअरमन राजेंद्र चकोर, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे,संचालक संतोष मांडेकर,  यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

दूध उत्पादनामध्ये भारत हा जगात प्रथम क्रमांकाचा देश असून महाराष्ट्रात देशामध्ये सहाव्या क्रमांकाने दूध उत्पादन होते. दूध विक्रीला झोनबंदी नसून विश्वास आणि गुणवत्तेमुळे राजहंस हा ब्रँड झाला असल्याचे गौरवउद्गार बागडे यांनी काढले.

तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या दूध संघाची 400 लिटर पासून सुरू झालेली वाटचाल आता 4 लाखापर्यंत येत आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने कायम शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याच्या आर्थिक विकासासाठी काम केले आहे. गुणवत्ता आणि उच्च प्रतीचे दूध असल्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये मोठी विक्री आहे. सुमारे 550 कोटींची दूध संघाची आर्थिक उलाढाल असून चांगल्या दराबरोबर दिवाळीला रिबेटच्या रूपाने शेतकऱ्यांना मोठी मदत केली जात असल्याचे ते म्हणाले. 

COMMENTS