Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात 

कर्जत : तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २३ एप्रिल) उघडकीस आली. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पवार यांनी मिरजगाव परिसरातील क्रांती चौकात चालणाऱ्या जुगार क्लबच्या चालकाकडे “क्लब सुरळीत चालू ठेवण्यासाठी” ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तीने याबाबत अहिल्यानगर येथील एसीबीकडे पूर्वीच लेखी तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजता मिरजगाव येथील क्रांती चौक परिसरात आरोपी पवार यांना बोलावण्यात आले. तक्रारदाराने त्यांना ठरलेली ५ हजार रुपयांची रक्कम दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत पवार यांना रंगेहात पकडले. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, बाबासाहेब कऱ्हाड, रवी निमसे व चालक हरून शेख यांनी सहभाग घेतला. सापळा यशस्वी झाल्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून तपासानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. घटनेची बातमी समोर येताच परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलीस दलाच्या प्रतिमेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

श्रीगोंद्याचा गोव्यात ऐतिहासिक डंका; ९ सुवर्णपदकांसह २ ‘नॅशनल टायटल बेल्ट’वर कोरले नाव
सावकाराच्या जाचास कंटाळून तरुणाची आत्महत्या
कोपरगावात मंगळवारी प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन कार्यशाळा
मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे दोन लाचखोर पोलीस कर्मचारी

कर्जत : तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २३ एप्रिल) उघडकीस आली. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पवार यांनी मिरजगाव परिसरातील क्रांती चौकात चालणाऱ्या जुगार क्लबच्या चालकाकडे “क्लब सुरळीत चालू ठेवण्यासाठी” ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तीने याबाबत अहिल्यानगर येथील एसीबीकडे पूर्वीच लेखी तक्रार दिली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजता मिरजगाव येथील क्रांती चौक परिसरात आरोपी पवार यांना बोलावण्यात आले. तक्रारदाराने त्यांना ठरलेली ५ हजार रुपयांची रक्कम दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत पवार यांना रंगेहात पकडले.

या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, बाबासाहेब कऱ्हाड, रवी निमसे व चालक हरून शेख यांनी सहभाग घेतला. सापळा यशस्वी झाल्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून तपासानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. घटनेची बातमी समोर येताच परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलीस दलाच्या प्रतिमेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

COMMENTS