Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘सनराईज’चा बारावीचा १०० टक्के निकाल

श्रीगोंदा : येथील सनराईज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी बोर्ड परीक्षा २०२५-२६ मध्ये दैदिप्यमान कामगिरी करत तिन्ही शाखांचा १०० टक्के निकाल नोंदवला. ही माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या राजेश्री शिंदे यांनी दिली.  महाविद्यालयातून अनुराधा ज्ञानेश्वर हराळ हिने ८५.१७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.   मयुरी उद्धव वाळके हिने ७७.३३ टक्के गुणांसह द्वितीय, तर सार्थक सूर्यभान टकले याने ७५.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. माहिती तंत्रज्ञान विषयातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. श्रेया धर्मेंद्र जगताप हिने ९७ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर  अनुराधा हराळ व अनुष्का दत्तात्रय फटे यांनी प्रत्येकी ९६ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. संस्थेचे अध्यक्ष सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहटादेवी सेवा प्रतिष्ठानतर्फे ‘केजी टू पीजी’ शिक्षणाची सुविधा तालुक्यातील वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना अल्प शुल्कात उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान व कॉम्प्युटर सायन्स हे विषय सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी महाविद्यालयात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालात दिसून आला आहे. यंदा अनेक महाविद्यालयांचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी लागले असतानाही सनराईज महाविद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय झेप घेतली आहे. या यशाबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षक व पालकांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सावित्रीच्याच लेकींचा डंका !
लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलचा 100% निकाल; 10 वी सीबीएसई परीक्षेत विद्यार्थ्यांची गौरवशाली कामगिरी
अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल

श्रीगोंदा : येथील सनराईज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी बोर्ड परीक्षा २०२५-२६ मध्ये दैदिप्यमान कामगिरी करत तिन्ही शाखांचा १०० टक्के निकाल नोंदवला. ही माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या राजेश्री शिंदे यांनी दिली.

 महाविद्यालयातून अनुराधा ज्ञानेश्वर हराळ हिने ८५.१७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.   मयुरी उद्धव वाळके हिने ७७.३३ टक्के गुणांसह द्वितीय, तर सार्थक सूर्यभान टकले याने ७५.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

माहिती तंत्रज्ञान विषयातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. श्रेया धर्मेंद्र जगताप हिने ९७ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर  अनुराधा हराळ व अनुष्का दत्तात्रय फटे यांनी प्रत्येकी ९६ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला.

संस्थेचे अध्यक्ष सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहटादेवी सेवा प्रतिष्ठानतर्फे ‘केजी टू पीजी’ शिक्षणाची सुविधा तालुक्यातील वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना अल्प शुल्कात उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान व कॉम्प्युटर सायन्स हे विषय सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी महाविद्यालयात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालात दिसून आला आहे.

यंदा अनेक महाविद्यालयांचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी लागले असतानाही सनराईज महाविद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय झेप घेतली आहे. या यशाबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षक व पालकांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS