Homeताज्या बातम्या

एसटीच्या तीथार्र्र्ंटन योजनेत खासगी भागीदारीपरिवहनमंत्री सरनाईक यांची माहिती ; रोजगार, उद्योजकतेच्या नव्या संधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे - एसटी संगे तीर्थाटन’ योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा महत

नव्या सरकारची प्रतिक्षा आणि ईव्हीएम विरोध!
तर आमदार,खासदार,मंत्री यांची खैर नाही ः सावंत
सीमाप्रश्न राजकारणाचे हत्यार नव्हे !
MSRTC Pratap Sarnaik : महिनाभरात एसटीचा उत्पन्न वाढवा, अन्यथा कारवाई : परिवहन मंत्री सरनाईक यांचा इशारा

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन’ योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत अनुभवी पर्यटन संस्थांचा सहभाग स्वीकारण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून, त्यामुळे भाविकांना कमी खर्चात सुरक्षित आणि सर्वसमावेशक तीर्थयात्रेचा लाभ मिळणार आहे. तसेच राज्यातील युवक-युवतींसाठी पर्यटन क्षेत्रात रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, या उपक्रमामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, तसेच प्रवाशांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध होतील. नव्या धोरणानुसार, भाविकांना प्रवासासोबतच निवास, भोजन, अल्पोपहार, स्थानिक दर्शन, मार्गदर्शक सेवा, तसेच टोल, वाहनतळ शुल्क आणि मंदिर प्रवेश व्यवस्थेची सुविधा एकाच आराखड्यात मिळणार आहे. या सर्व पूरक जबाबदार्‍या संबंधित पर्यटन संस्था पार पाडतील. यामुळे प्रवाशांना स्वतंत्र नियोजनाचा त्रास सहन करावा लागणार नाही आणि संपूर्ण तीर्थयात्रा अधिक सुलभ व सुरक्षित होईल. या योजनेत बससेवा, प्रवासी वाहतूक आणि प्रवासभाड्याचे संपूर्ण उत्पन्न एसटी महामंडळाकडेच राहणार आहे. त्याशिवाय, खासगी संस्थांना मिळणार्‍या उत्पन्नातील किमान दहा टक्के हिस्सा एसटी महामंडळाला देणे बंधनकारक असेल. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आर्थिक बळकटीसही मदत होणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर पात्र घटकांना शासनाकडून मिळणार्‍या प्रवास सवलती या योजनेत कायम राहतील. त्यामुळे खासगी पर्यटन सेवांच्या तुलनेत एसटीच्या माध्यमातून होणारी तीर्थयात्रा अधिक परवडणारी ठरणार आहे.

COMMENTS