Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोणत्याही राजकीय पक्षाला गावात फिरकू देणार नाही; शेतकरी संघटनेचा निर्धार

इस्लामपूर : सुमनताई अग्रवाल यांना एक लाख रुपये देताना रघुनाथ व कमल पाटील शेजारी राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे, कार्याध्यक्ष कालिदास आपटे, वर्षा काळ

कवठेएकंदजवळ विटा-सांगली बसवर दगडफेक; चालक जखमी
कराड येथील महिलेच्या खूनाचा उलगडा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह माजी खा. राजु शेट्टी एकाच बँनरवर; राजकिय चर्चेला उधाण

सुमनताई अग्रवाल यांना लाखाची थैली
शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात आवाज उठवण्याचे काम करणार्‍या पहिल्या फळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष सुमनताई अग्रवाल यांना एक लाख रुपये देत क्रांतिवीर आप्पासाहेब ऊर्फ रामचंद्र भाऊराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ व कमल पाटील यांनी सत्कार केला. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. सुमनताई अग्रवाल मुळच्या वरुड-वर्धा येथील आहेत.

इस्लामपूर / प्रतिनिधी : शेतीक्षेत्राला खुली अर्थव्यवस्था, खुलेकरणाचे वारे लागल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सर्व शेतमालावरील व तंत्रज्ञानावरील निर्यात बंदी उठली पाहिजे, दोन कारखान्यामधील अंतराची अट रद्द झाली पाहिजे. या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला गावात फिरकू दिले जाणार नाही, असा निर्धार शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी इस्लामपूर येथे केला.
येथील निर्मला सांस्कृतिक भवन मध्ये शेतकरी मेळावा झाला. यावेळी राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष वर्षा काळे उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा अध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी स्वागत केले.
शेतकरी नेते रघुनाथ पाटील म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधात आहे. गेल्या चाळीस वर्षापासून हे अनुभवत आलो आहे. शेतकरी हिताच्या विरोधी भूमिका आहे. शेतकर्‍यांचे वाटोळे करण्याचे काम सध्या सुरू आहे. ऊस उत्पादकांसाठी असणारा एसएमपीचा कायदा शरद पवार आणि त्यांच्या पाळीव शेतकरी संघटनांनी एकत्रित येत सन 2009 ला रद्द केला. आता पुन्हा एफआरपीच्या कायद्यातील शेतकर्‍यांचे हक्क हिरावून घेतले आहेत. शेतकर्‍यांना दर मागण्यासाठी कोणत्याही तरतुदी ठेवलेल्या नाहीत. देशातील भाजपा सरकार आणि राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या चारही राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून द्या. उस व इथेनॉल कारखान्याची अंतराची अट जाणीवपूर्वक ठेवण्यात आली आहे. नव्याने कोणालाही इथेनॉलची निर्मिती करता येणार नाही. कायद्यानेच राजकारण्यांनी ही तरतूद केली आहे. शेतकर्‍यांना गरीब करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उसाला भावही देत नाहीत आणि दुसरे कारखाने उभे करू दिले जात नाहीत. चारही राजकीय पक्षांना सळो की पळो करा असा सल्ला त्यांनी दिला.
याप्रसंगी धनंजय काकडे, माणिक शिंदे, ऊस नियंत्रण समितीचे सदस्य बाळासाहेब पठारे, शिवाजीनाना नांदखिले यांनी मार्गदर्शन केले. धनपाल माळी यांनी आभार मानले. शेतकरी संघटनेचे लक्ष्मण पाटील, केतन जाधव, प्रणव पाटील, माणिक पाटील, रवींद्र पिसाळ, माणिक व परशुराम माळी, नंदू पाटील, शंकरराव मोहिते, प्रदीप पवार यांनी संयोजन केले.

COMMENTS