Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरपंचायतीत सत्ताधार्‍यांचा अनागोंदी कारभार; हर्षवर्धन शेळके-पाटील यांचा आरोप

लोणंद : अतिक्रमण हटविल्यानंतर गाडीत भरलेले भंगार. (छाया : सुशिल गायकवाड) लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथे अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली

राजारामबापू सहकारी बँकेस 36.48 कोटींचा नफा : शामराव पाटील
कोरेगाव न्यायालयासाठी 60 लाखांचा निधी मंजूर
काँग्रेसचा विचार देशाला प्रगतीकडे नेणारा : आ. पृथ्वीराज चव्हाण

लोणंद / प्रतिनिधी : लोणंद, ता. खंडाळा येथे अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली आहे. राजीव गांधी शॉपिंग सेंटरचे पत्र्याचे असलेले 17 गाळे ही पाडण्यात आले आहेत. हे गाळे स्वतः नगरपंचायतीचे आहेत. अतिक्रमण हटविल्यानंतर हे सर्व साहित्य भंगारात देण्यासाठी नगरपंचायतीमध्ये
भंगार व्यवसायिकांची घाईगडबडीने बैठक घेऊन अनागोंदी कारभार केला असल्याचा आरोप युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील यांनी केला. यावेळी सत्वशील शेळके-पाटील, संदीप शेळके पाटील, सामाजिक कार्यकर्ते कय्युम मुल्ला व इतर उपस्थित होते.
भाजपचे युवा नेते यांनी असे म्हटलेले आहे की, लोणंद नगरपंचायतने पालखीच्या नावाखाली 400 हुन अधिक लोकांचे अतिक्रमण काढून व्यवसाय उध्वस्त केले. सत्ताधारी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी अतिक्रमण कारवाई होताना कोठेही तोंड दाखवले नाही. याउलट राहिलेली गोरगरिबांची दुकाने दाखवली. राजीव गांधी शॉपिंग सेंटरचे पत्र्याचे 17 गाळे हे कोणतीही नोटीस न देता काढले होते. सत्तारूढ नगरपंचायत बॉडीने घाईगडबडीने नगरपंचायत सभागृहात भंगार व्यावसायिकांची बैठक लावली. माजी उपनगराध्यक्षाला भंगार घेऊन जायचे टेंडर ही दिले हे टेंडर फक्त 40 हजार रुपयात 17 गाळ्यांचे पत्रे व चॅनेलसाठीचे दिले गेले. भंगार व्यावसायिकाने हा प्रकार सांगितल्यानंतर संबंधित कर्मचार्‍यांना फोन लावून विचारले असता आम्ही कोणी कर्मचार्‍यांनी निलाव केला नाही. लिलाव करण्यासाठी फक्त राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. असे सांगून हात झटकले. मुख्याधिकार्‍यांना फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही. व्हाट्स अ‍ॅप मेसेज पहिले परंतू उत्तर दिले नाही, असे म्हटले आहे. अशा अनागोंदी कारभाराचा निषेध करत असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS