कोपरगाव : सांगवीभुसार (ता. कोपरगाव) येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना २९ जून २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सांगवीभुसार गावाच्या शिवारातील गोदावरी नदीपात्रात पोलिस पथकाने छापा टाकला. यावेळी काही इसम डंपरमध्ये अवैधरीत्या वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच वाळू भरणारे इसम घटनास्थळावरून पसार झाले.यावेळी पोलिसांनी डंपर चालकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव आकाश दत्तू पिंपळे (वय १९, रा. खेडले झुंगे, ता. निफाड, जि. नाशिक) असे सांगितले. तसेच संबंधित डंपर हा कुणाल उर्फ सोनू (रा. सिन्नर, जि. नाशिक) याचा असून त्याच्या सांगण्यावरून वाळू भरत असल्याची माहिती दिली. या कारवाईत विना क्रमांकाचा पिवळ्या रंगाचा डंपर व त्यामधील दोन ब्रास शासकीय वाळू असा एकूण १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पो.ना.घुमनाथ कारखेडे, पो.कॉ.अंबादास वाघ, पो.कॉ.जयदीप गवारे, पो.कॉ.राम खारतोडे व पो.कॉ.युवराज खुडे यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS