Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक  डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक, नागनाथ कोतापल्ले याचे अल्प आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्ष

विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकाचा मृत्यू
कोपरगावचा पाणी प्रश्‍न सुटणार – आ. आशुतोष काळे; 5 नंबर साठवण तलावाला 120 कोटींच्या खर्चाची तांत्रिक मंजुरी
नाशिकमध्ये फटाक्यामुळे लागलेल्या आगीत दुकान भस्मसात

पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक, नागनाथ कोतापल्ले याचे अल्प आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी-चिंचवडच्या राहत्या घरी सून आणि मुलगा त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. परंतु, गेल्या 15 दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. नागनाथ कोत्तापल्ले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु होते. तसेच चिपळूण इथे पार पडलेल्या 86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन तसेच समीक्षापर लेखन केले. यामध्ये पापुद्रे, ग्रामीण साहित्य : स्वरुप आणि शोध, नवकथाकार शंकर पाटील, साहित्य अन्वयार्थ, मराठी कविता एक दृष्टीक्षेप, साहित्याचा अवकाश हे त्यांचे समीक्षणपर लेखन प्रसिद्ध आहे.

COMMENTS