माहूर गडावर येण्यासाठी तिन्ही बाजूने घाटाचे रस्ते असून तिन्ही रस्ते भाविकांच्या मृत्यूला आमंत्रण देत असल्याने सर्वात जास्त रहदारीचा रस्ता असलेला

माहूर गडावर येण्यासाठी तिन्ही बाजूने घाटाचे रस्ते असून तिन्ही रस्ते भाविकांच्या मृत्यूला आमंत्रण देत असल्याने सर्वात जास्त रहदारीचा रस्ता असलेला पैनगंगा नदी धनोडा केरोली मार्गावरील नवीन पूल चालू केला नसल्याने पुलाच्या दोन्ही बाजूकडे रस्त्यावर प्रचंड खड्डे झाले असून या खड्ड्यात भाविकांच्या वाहनाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतरच नवीन पुलावरून रस्ता चालू होईल का असा संतप्त सवाल भाविकातून होत आहे.
गेल्या तीन वर्षा आधी नवीन पूल तयार झाला असून दोन्ही बाजूकडील रस्ते मुरूम दबाईने पूर्ण करण्यात आले परंतु सिमेंट काँक्रीटचा वरचा थर टाकण्यात आला नसल्याने रस्ता चिखलमय होऊन वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वाहने स्लिप होऊन छोटे मोठे अपघातही घडत आहेत. सदरील बाब स्वतः कंत्राटदार उघड्या डोळ्यांनी पाहत असूनही त्यावर साधे मुरूम चूरी टाकून रस्ता चालण्या योग्य बनविला जात नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. अनेक मान्यवरांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले राष्ट्रीय महामार्ग विभाग कंत्राटदार यांना निवेदने दिली परंतु काहीच फरक पडला नसल्याने आज पूर परिस्थितीतही रस्ता बनविला गेला नसल्याने जुन्या पुलावरून कधी वाहतूक बंद होईल याचा नेम नाही गतवर्षी तीन दिवस वाहतूक बंद होती, तरीही सदर कंत्राटदाराने पूलाकडील दोन्ही बाजूचे काम न करता वाहनधारकांना आर्थिक मानसिक त्रास देण्याचे कुटील कारस्थान रचलेले असल्याने कंत्राटदाराला दंडीत करून तात्काळ रस्ता बनवत नवीन पूल चालू करावा अशी मागणी होत आहे.

COMMENTS