Homeताज्या बातम्या

नांदेडमध्ये खंजराचा धाक दाखवून १०.५० लाखांची बॅग पळवणारा फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

नांदेड : जुना मोंढा भागातील आरबुंदा ट्रेडिंग ऑफिसमध्ये खंजराचा धाक दाखवून १० लाख ५० हजार रुपयांची बॅग जबरदस्तीने पळवणार्‍या दरोड्याच्या टोळीतील म

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांची मोठी कारवाई; ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहिमेचा धडाका
भोकर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट पावत्यांच्या आधारे खत विक्री करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड, फरार आरोपीस अटक

नांदेड : जुना मोंढा भागातील आरबुंदा ट्रेडिंग ऑफिसमध्ये खंजराचा धाक दाखवून १० लाख ५० हजार रुपयांची बॅग जबरदस्तीने पळवणार्‍या दरोड्याच्या टोळीतील मुख्य आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. निखिल संभाजी वाठोरे (वय १९, रा. सुमेधनगर, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मागील अडीच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जालना येथील व्यापारी सोहनलाल मोतीलालजी परमार यांच्या जुना मोंढा येथील ’आरबुंदा ट्रेडिंग’ या आडत ऑफिसमध्ये तीन अनोळखी इसम घुसले होते. त्यांनी ऑफिसमधील कर्मचारी शिवहार पतरावाळे यांना खंजराचा धाक दाखवून ऑफिसमध्ये ठेवलेली १० लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली होती. याप्रकरणी १ एप्रिल २०२६ रोजी वजीराबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांसह शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना देण्यात आले होते.

१८ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांचे पथक वजीराबाद परिसरात गस्त घालत असताना, सदर गुन्ह्यातील फरार आरोपी निखिल वाठोरे हा पूर्णा रोडवरील शेतकरी पुतळा परिसरात थांबलेला असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पुढील कारवाईसाठी वजीराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश कोरे, पोलीस अंमलदार सुनील गटलेवार, माधव माने, श्रीराम दासरे आणि मनोज राठोड यांच्या पथकाने केली. या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.

COMMENTS