कोपरगाव : प्रसिद्ध लेखक व प्रेरणादायी वक्ते रॉबिन शर्मा यांच्या मते, यश प्राप्त करण्यासाठी सातत्य आणि कठीण परिश्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते सांगतात की दररोज स्वतःला कालपेक्षा थोडे अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असून, यश एका दिवसात मिळत नाही तर ते सातत्यपूर्ण प्रयत्नांतून घडते. तसेच, नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. आपल्या उद्दिष्टांची स्पष्ट आखणी करून आणि सकारात्मक विचारांची जोपासना केल्यास यशाचा मार्ग सुकर होतो, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ.मनाली अमित कोल्हे यांनी केले.संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजने सन २०२४-२५ मध्ये संजीवनीचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्मृतिप्रित्यर्थ इ. ११वी च्या प्रवेशाच्या वेळी घेतलेल्या ‘संजीवनी टॅलेंट सर्च’ या परीक्षेत पहिल्या ३० गुणानुक्रमाने उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘प्रतिभा उत्सव २०२६’ या कार्यक्रमात गौरविण्यात आले. या प्रसंगी डॉ.कोल्हे प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ.रावसाहेब शेंडगे, प्रा. रेखा साळुंके, उपप्राचार्य प्रा. मोहन सोनवणे, समन्वयक प्रा.सागर निकम, आदी उपस्थित होते.या परीक्षेत सध्या इ.१२ वीला जाणारे सायन्स विभागाच्या २६ व कॉमर्स विभागाच्या ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात ४०० विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे रोख बक्षिस व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. डॉ.शेंडगे यांनी भविष्यातील स्पर्धा परीक्षांविषयी माहिती दिली.

COMMENTS