लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी शास्त्र संस्था, लोणी अंतर्गत कृषी व्यवसाय व्यवस्थाप

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी शास्त्र संस्था, लोणी अंतर्गत कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर येथे गावप्रवेश उत्साहात पार पडला.यावेळी गावचे सरपंच आण्णासाहेब पारधे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या उपक्रमामध्ये गटप्रमुख गीतांजली डोखे तसेच समीक्षा भाबड, अस्मिता गारुळे, अश्विनी हुक्केरी, साक्षी मोटे आणि किर्ती शेरमाळे यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमासाठी प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, कृषी शिक्षण संचालक डॉ. उत्तमराव कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य व विभाग प्रमुख डॉ. संतोष वर्पे, प्रा.प्रेरणा अभंग तसेच विभाग समन्वयक प्रा. सत्येन खर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी उपसरपंच दीपाली तांबे, ग्रामसेवक संदीप रामदास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रेखा गवळी, प्रदीप माळी, शहाजी तांबे, प्रियंका तांबे आदी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमास शुभेच्छा देत सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून आधुनिक शेती पद्धती, कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, शासनाच्या कृषी योजना तसेच कृषीपूरक व्यवसायांविषयी जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी गाव सर्वेक्षण, शेतभेटी, शेतकरी मार्गदर्शन, कृषी विस्तार उपक्रम तसेच विविध प्रात्यक्षिके आयोजित करणार आहेत.

COMMENTS