Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मविआच्या बैठकीला आंबेडकर मारणार दांडी ?

मुंबई ः महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला असला तरी, अजूनही जागा वाटप न झाल्यामुळे वंचितने जागा वाटपाचा तिढा सोडवण्याची मागणी के

मविआ-वंचितची बोलणी फिस्कटली ?
आमचे वैचारिक व्यासपीठ एकच – उद्धव ठाकरे
मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी – प्रकाश आंबेडकर

मुंबई ः महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला असला तरी, अजूनही जागा वाटप न झाल्यामुळे वंचितने जागा वाटपाचा तिढा सोडवण्याची मागणी केली होती. त्यामुळे जागा वाटपावर आज मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. मात्र या बैठकीला वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर अनुपस्थित राहणार असल्याचे समोर आहे. यासाठी त्यांनी पुण्यात होणार्‍या जाहीर सभेचा दाखला दिला आहे.
आघाडीने आपली बैठक आज मंगळवारीऐवजी उद्या बुधवारी ठेवल्यास आमच्या सोईचे होईल, असेही ते म्हणालेत. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या डोक्यात वेगळेच काहीतरी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. आंबेडकर यांनी सोमवारी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जयंत पाटील यांचा काल फोन आला. त्यांनी 27 फेब्रुवारीच्या बैठकीची माहिती दिली. परंतु, 27 तारखेला आम्ही येऊ शकत नाही. कारण, पुण्याला जाहीरसभा आहे आणि महाराष्ट्राची पूर्ण कमिटी तिथे गुंतलेली आहे. आम्ही त्यांना विनंती केली की 28 तारखेला शक्य होत आहे का पाहा. 28 तारखेच्या बैठकीचे तपासतो असे ते म्हणाले. परंतु, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत 27 ला बैठक आहे असे सांगण्यात आले. पुण्यात वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आहे. त्यामुळे 27 च्या बैठकीला आम्ही येऊ शकत नाही. 28 ला बैठक होणार असेल तर आम्ही तेव्हा येऊ, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

COMMENTS