Homeताज्या बातम्याअहमदनगर

दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 

राहाता : शहरातील हनुमान चालीसा सेवा मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे शहरातील दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्

आ. तांबे यांची स्टेअर्स महाराष्ट्र गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड
‘मिशन 2029’ की अंतर्गत संघर्ष?परभणी भाजपात गटबाजीचा स्फोट; प्रभारींसमोर अस्तित्वाची लढाई
सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर

राहाता : शहरातील हनुमान चालीसा सेवा मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे शहरातील दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित गुणवंत विद्यार्थिनी व विद्यार्थी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.शहरातील हनुमान मंदिरामध्ये सायंकाळी राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे,माजी नगर अध्यक्ष कैलास सदाफळ, निलेश तारगे,अभिजीत पिपाडा आदी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना हनुमानाची प्रतिमा व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना राहाता पोलीस स्टेशनचे पीआय म्हणाले की आपल्या देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात आहे. तरुणांनी व्यसनाधीन न होता आपला करिअरचा चांगला मार्ग निवडावा.  मोबाईलच्या मागे न लागता आपलं करिअर कसे निर्माण करता येईल याचा या तरुणांनी विचार केला पाहिजे. माझी मुलगी सुद्धा दहावीला होती. तिला 94% गुण पडून ती  उत्तीर्ण झाले आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.तसेच बाल शिव व्याख्याते धनराज शेटे यांनी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर म्हटले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जे कोणी घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. तुम्ही खूप मोठे व्हा पण आपल्या माय माऊली यांना विसरू नका असे शेटे म्हणाले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक दशरथ तुपे, संजय शिंदे, दर्शन खांबेकर, सुरेश देव्हारे, सुनील देव्हारे, ओम सोमवंशी, साई खांबेकर, किसन बिडवे, मीराबाई कुंभकर्ण, अनुराधा झळके आदींनी कार्यक्रम यशस्वी साठी प्रयत्न केले.

COMMENTS