Homeताज्या बातम्या

बांकीपूरमध्ये प्रशांत किशोरांचा भाजपला धक्का

भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात विजय; नीरज कुमार पराभूत नवी दिल्ली : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जन सूरज पक्षाचे सं

आषाढी एकादशी निमित्त श्रीगुरू बंकटस्वामी मठात फराळाचे आयोजन; नेकनूर येथे भाविकांची मोठी उपस्थिती
कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; आरोग्य विभागाचा माजी उपसंचालक सूत्रधार
बीड-पुणे रेल्वे तातडीने सुरू करा; रेल्वे बोर्डाने दाखविली सकारात्मकता

भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात विजय; नीरज कुमार पराभूत

नवी दिल्ली : बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जन सूरज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी भाजपला मोठा धक्का देत दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा १८ हजार ९५३ मतांनी पराभव केला. प्रशांत किशोर यांना ६३ हजार २०३ मते मिळाली, तर नीरज कुमार यांना ४४ हजार २५० मतांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार रेखा कुमारी यांना १४ हजार ८५ मते मिळाली. त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

बांकीपूर हा भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. नवीन हे येथून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेत. ते राज्यसभेवर गेल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. मात्र याठिकाणी जन सूरज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवलाय.

जरी या विजयाचा बिहार सरकार स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नसला, तरी सत्ताधारी भाजप आणि जेडी(यू) यांना राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा एक स्पष्ट संदेश यातून गेलाय. निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरत असताना प्रशांत किशोर यांनी जनतेचा एक महत्त्वाचा संदेश दिलाय. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी गुजरातप्रमाणेच बिहारवरही तितकेच लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून या राज्यातील तरुणांना रोजगारासाठी इतर राज्यांत स्थलांतर करावे लागणार नाही. जर गुजरातला ‘हाय-स्पीड ट्रेन’ मिळत असेल, तर बिहारला किमान एक प्रवासी गाडी तरी मिळायला हवी, असं प्रशांत किशोर म्हणाले होते.

राजकीय रणनीतीकार ते राजकीय नेतृत्व

प्रशांत किशोर हे मूळचे बिहारचे असून देशातील प्रमुख राजकीय पक्षांसाठी रणनीतीकार म्हणून त्यांनी काम केले आहे. २०१५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत राजद, जनता दल (यू) आणि काँग्रेसच्या महाआघाडीच्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यानंतर पंजाबमधील काँग्रेस, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस, दिल्लीतील आम आदमी पक्ष, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडूमधील द्रमुकसाठीही त्यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केले. आता जन सूरज पक्षाच्या माध्यमातून त्यांनी थेट राजकारणात प्रवेश केला असून बांकीपूरमधील विजयामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.

COMMENTS