Homeताज्या बातम्या

मुंबई पोलीस दलात तब्बल ६.४१ कोटींचा वेतन घोटाळा उघड; दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलीस दलात वेतन घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई झाली आहे. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांव

‘ऑपरेशन टायगर’शी भाजपचा संबंध नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचे आरोप फेटाळले
रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर १०० टक्के आयात शुल्काचा धोका; अमेरिकन सिनेटकडून निर्बंध विधेयकाला पुढील टप्प्यास मंजुरी
दिल्लीतील आंदोलन केवळ नौटंकी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांवर जोरदार पलटवार
Mumbai Police : चोरांना पकडणार्‍या मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा घोटाळा  उघडकीस

मुंबई : मुंबई पोलीस दलात वेतन घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई झाली आहे. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तत्कालीन प्रमुख लिपिक आरोपी विजया चव्हाण आणि तत्कालीन वरिष्ठ लिपिक अमोल मेम्राम यांना सेवेतून निलंबित करण्यात आले असून दोघांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. समतानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

समतानगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि कट रचून वेतन घोटाळा केल्याचा आरोप आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघेही सेवेतून निलंबित राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सहपोलीस आयुक्त (प्रशासन) यांच्याकडून हे निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पोलीस नसलेल्यांच्या नावाने लाटले कोट्यवधी रुपये

पोलीस नसलेल्या व्यक्तींना पोलीस कर्मचारी असल्याचे दाखवून कोट्यवधींचा वेतन घोटाळा केल्याचा आरोप आहे. तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण यांच्यासह इतरांवर गंभीर आरोप आहेत. खोटी वेतन देयके सादर करून शासकीय निधीचा गैरवापर व अपहार केल्याचा दावा करण्यात आला असून यात शासनाची तब्बल ६ कोटी ४१ लाख १४ हजार ३६ रुपयांची फसवणूक झाली आहे.

गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल

या प्रकरणात प्रमुख लिपिक अजय राठोड व कनिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांचाही समावेश आहे. संबंधितांविरोधात फसवणूक, अपहार, बनावट कागदपत्रे तयार करणे व पुरावे नष्ट करण्यासह भादंवि कलम ४०९, ४२०, ४०६, ४६७, ४६५, ४७१, २०१, १२०(ब) व ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

कधी झाला घोटाळा?

हा घोटाळा २०१९ आणि २०२० मध्ये झाला. २०१९ च्या डिसेंबरमध्ये आणि त्यानंतर २०२० मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, तसेच जून ते सप्टेंबर २०२० दरम्यानच्या वेतनात हा घोटाळा झाल्याचा संशय आहे. तपासात २०१९ ते २०२० मधील वेतन खात्यात मोठी तफावत आढळून आली असून वेतन व प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या ५ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासकीय आणि वेतन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा अपहार केल्याचा प्राथमिक संशय आहे.

COMMENTS