नवी दिल्ली : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स, बॅगपाइपर, रॉयल चॅलेंज आणि अँटीक्विटी ब्ल्यू यांसारख्या अत्

नवी दिल्ली : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स, बॅगपाइपर, रॉयल चॅलेंज आणि अँटीक्विटी ब्ल्यू यांसारख्या अत्यंत लोकप्रिय रम आणि व्हिस्की ब्रँड्सच्या विशिष्ट उत्पादनांवर कठोर कारवाई केली आहे. ही कारवाई काही विशिष्ट उत्पादने आणि उत्पादन केंद्रांमधील नियमभंगाच्या आरोपांशी संबंधित आहे.
FSSAI च्या तपासात काही उत्पादकांनी रम आणि व्हिस्कीला नैसर्गिकरित्या परिपक्व (Aged) झाल्यासारखा स्वाद व सुगंध देण्यासाठी कृत्रिम किंवा “Nature Identical” फ्लेवरिंगचा वापर केल्याचे समोर आले आहे. नियमांनुसार रम, व्हिस्की, ब्रँडी आणि जिन यांसारख्या मद्यांमध्ये विशिष्ट स्वाद हा मूळ घटकांमधूनच यायला हवा. कृत्रिम फ्लेवर्सचा वापर नियमांचे उल्लंघन मानले गेल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही कारवाई सर्व राज्यांतील उत्पादनांवर आहे की ठराविक केंद्रांपुरती, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
बंदी किंवा आक्षेप असलेल्या मुख्य ब्रँड्सचे व्हेरियंट्स:
- ओल्ड मॉन्क (Old Monk): काही विशिष्ट व्हेरियंट्स
- मॅकडॉवेल्स (McDowell’s No.1 Rum): रम व्हेरियंट
- बॅगपाइपर (Bagpiper Deluxe Whisky): व्हिस्की व्हेरियंट
- रॉयल चॅलेंज (Royal Challenge Whisky): व्हिस्की व्हेरियंट
- अँटीक्विटी ब्ल्यू (Antiquity Blue Whisky): व्हिस्की व्हेरियंट
FSSAI च्या कारवाईची ६ प्रमुख कारणे: १. विक्रीस मनाई केलेले प्रॉडक्ट्स दर्जाहीन तसेच ग्राहकांची दिशाभूल करणारे आढळले. २. रम किंवा व्हिस्की मूळ घटकांऐवजी फ्लेवर टाकून तयार केली गेली. ३. कृत्रिम फ्लेवरिंगमुळे मद्याची मूळ नैसर्गिक चव आणि गंध नष्ट झाला. ४. मोलेसस किंवा माल्टचा योग्य वापर न करता शॉर्टकट पद्धतीचा वापर केला गेला. ५. प्रॉडक्ट नेमक्या कशापासून बनवले आहे, याचा बॉटल स्टिकरवर स्पष्ट उल्लेख नाही. ६. असे प्रॉडक्ट्स ‘रम/व्हिस्की’ऐवजी ‘रम फ्लेवर्ड स्पिरिट’ किंवा ‘व्हिस्की फ्लेवर्ड स्पिरिट’ म्हणून विकणे बंधनकारक होते.
कंपन्यांची भूमिका: संबंधित उत्पादनांची विक्री काही ठिकाणी तात्पुरती थांबवली जाऊ शकते. अंतिम नियामक निर्णय येईपर्यंत परिस्थिती बदलू शकते. दरम्यान, संबंधित कंपन्यांनी नियमांचे योग्य पालन केल्याचा दावा करत या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. हा वाद सुरक्षिततेपेक्षा नियमांच्या तांत्रिक व्याख्येशी संबंधित असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

COMMENTS