Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यात गणदीप  इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रूम ला लागली आग

ठाणे प्रतिनिधी - आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार गणदीप इमारत, तिरुपती बालाजी सोसायटी जवळ कळवा, ठाणे (प) या ठ

राजकारणातील घराणेशाही
‘पर्यटन’च्या 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती
सोनम कपूरच्या चिमुकल्याचं नाव आहे खूपच युनिक

ठाणे प्रतिनिधी – आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार गणदीप इमारत, तिरुपती बालाजी सोसायटी जवळ कळवा, ठाणे (प) या ठिकाणी गणदीप इमारत या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती असलेल्या या रुममध्ये आग लागली होती. सदर घटनास्थळी टोरंट पॉवरचे कर्मचारी, कळवा पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी , अग्निशमन दलाचे जवान ०२-रेस्क्यु वाहनासह, ०१-फायर वाहनासह व ०१-वॉटर टँकर सह उपस्थित होते. सदर घटनेमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ओमकार सुर्वे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. सदर घटनास्थळी घरामध्ये लागलेली आग आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी पूर्णपणे विझविली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

COMMENTS