Homeताज्या बातम्याबीड

गेवराई मतदारसंघात सामाजिक उपक्रमांनीमाजीमंत्री बदामराव पंडितांचा वाढदिवस साजरा

गेवराई विधानसभा मतदारसंघातील भाजप नेत, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांना दैवत मानणार्‍या गेवराई तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांकडून दरवर्षी

छाया सरोदे यांना मानाचा ‘युवा लोकमित्र जिव्हाळा माउली सन्मान 2026’ जाहीररक्ताची नाती दुरावलेल्या बेघर वृद्ध, अनाथ व वंचितांना मायेची भाकर देणार्‍या ‘माउली’चा बीडमध्ये होणार भव्य गौरव
पेट्रोल डिझेलचा तुटवडा सरकार जाणीवपूर्वक करतय- बीड जिल्हा काँग्रेस कमिटीसर्वसामान्यांना त्रस्त करून पेट्रोल डिझेलचा तुटवडा तयार करून भाव वाढवण्याचा डाव
शेतरस्त्यावर अतिक्रमण; तहसीलदारांचे चौकशी व कारवाईचे आदेशस्थानिक महसूल अधिकार्‍यांवर अविश्वास; बाहेरील अधिकार्‍यांकडून चौकशीची मागणी



गेवराई विधानसभा मतदारसंघातील भाजप नेत, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांना दैवत मानणार्‍या गेवराई तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांकडून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. गेवराई मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी गेवराई, माजलगाव आणि बीड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले.
भाजपा नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सौ गिरीकाभाभी पंडित, सौ अनुरूपाताई युधाजित पंडित यांनी औक्षण केले. याप्रसंगी जि.प. चे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित, युवानेते रोहित पंडित, युवानेते यशराज पंडित, राजवीर पंडित, नयनतारा पंडित यांची उपस्थिती होती. बदामराव पंडित यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील पदाधिकार्‍यांसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. बदामराव पंडित यांना दिवसानिमित्त पुस्तके त्यासोबतच वृक्ष, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन आलेल्या चाहत्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी आलेल्या प्रत्येकाशी अस्थेवाईकपणे चर्चा केली. तालुक्यातल्या प्रत्येक गावात असलेल्या अडीअडचणी याचीही माहिती उपस्थितांकडून घेतली दिवसभर व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व भाजप कार्यकर्त्यांची बदामराव पंडित यांच्या बंगल्यावर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

COMMENTS