कोपरगाव : शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील धारणगाव–कोपरगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या खड्ड्यांमुळे एखाद्या निरपराध नागरिकाचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवक इम्तियाज अत्तार यांनी कोपरगाव नगरपरिषदेला दिला आहे. शहरातील संजय नगर, सुभाष नगर, टिळक नगर या परिसरांना जोडणारा धारणगाव–कोपरगाव रस्ता अत्यंत महत्त्वाचा आणि गजबजलेला मार्ग मानला जातो. या रस्त्यावर वाहनांची तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असते. याच रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक असून स्मारकासमोरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र सत्ताधारी गटातील नगरसेवकाच्या हस्तकांमार्फत करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप अत्तार यांनी केला आहे. काम पूर्ण होऊन काही दिवसांतच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपरिषदेकडे यापूर्वीही तक्रार करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, सध्या संबंधित काम करणारेच सत्तेत असल्याने या निकृष्ट कामाची चौकशी होण्याची आशा नागरिकांनी सोडल्याची भावना व्यक्त होत आहे. किमान नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तरी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी अत्तार यांनी केली आहे. मागील पावसाळ्यात याच खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून आंदोलन करणारेच आता सत्तेत असून त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या जीवाशी खेळू नये व तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

कोपरगाव : शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील धारणगाव–कोपरगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या खड्ड्यांमुळे एखाद्या निरपराध नागरिकाचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवक इम्तियाज अत्तार यांनी कोपरगाव नगरपरिषदेला दिला आहे.
शहरातील संजय नगर, सुभाष नगर, टिळक नगर या परिसरांना जोडणारा धारणगाव–कोपरगाव रस्ता अत्यंत महत्त्वाचा आणि गजबजलेला मार्ग मानला जातो. या रस्त्यावर वाहनांची तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असते. याच रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक असून स्मारकासमोरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
या रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र सत्ताधारी गटातील नगरसेवकाच्या हस्तकांमार्फत करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप अत्तार यांनी केला आहे. काम पूर्ण होऊन काही दिवसांतच रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपरिषदेकडे यापूर्वीही तक्रार करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सध्या संबंधित काम करणारेच सत्तेत असल्याने या निकृष्ट कामाची चौकशी होण्याची आशा नागरिकांनी सोडल्याची भावना व्यक्त होत आहे. किमान नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तरी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी अत्तार यांनी केली आहे.
मागील पावसाळ्यात याच खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून आंदोलन करणारेच आता सत्तेत असून त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या जीवाशी खेळू नये व तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

COMMENTS