Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकास कामात गुणवत्तेबाबत तडजोड नाही : संधान; कर्मवीरनगरमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना गती; नगराध्यक्षांकडून पाहणी

 कोपरगाव : शहरातील कर्मवीरनगर भागातील अंतर्गत रस्त्यांची प्रलंबित कामे सुरू करण्यात आली असून, नगराध्यक्ष पराग संधान यांनी पदाधिकारी व नागरिकांसमव

तांभेरे येथे मृतावस्थेत आढळला बिबट्या
वारी येथे ‘महिला शक्ती’च्या हस्ते पाणपोईचे लोकार्पण
शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 कोपरगाव : शहरातील कर्मवीरनगर भागातील अंतर्गत रस्त्यांची प्रलंबित कामे सुरू करण्यात आली असून, नगराध्यक्ष पराग संधान यांनी पदाधिकारी व नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करत कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. तसेच विकास कामात गुणवत्तेबाबत तडजोड नाही असेही ठणकावून सांगितले.

कर्मवीरनगर हा पूर्वी नगरपरिषद हद्दीत नसलेला ‘हद्दवाढ’ भाग असून, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे हा भाग शहरात समाविष्ट झाला. या भागाच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला होता; मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कामे रखडली होती. आता नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी या कामांना गती दिली आहे.

नवीन नेतृत्वाखाली शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामे वेगाने सुरू झाली असून पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यास, रस्त्यांवरील धूळ कमी करण्यास तसेच स्वच्छतेच्या कामांना चालना मिळाल्याचे चित्र दिसत आहे. २०२४ मध्ये कार्यादेश मिळालेल्या पण अद्याप न सुरू झालेल्या कामांबाबत संबंधित ठेकेदारांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे आदेश नगराध्यक्ष संधान यांनी दिले.

रस्त्यांची कामे करताना अंदाजपत्रकानुसार गुणवत्ता राखावी, डांबर मोजणीच्या पावत्या सादर कराव्यात तसेच मंजूर निधी व कामाची माहिती दर्शविणारे फलक लावावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. “श्रेयासाठी नव्हे, तर सेवाभावातून कामे करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे सांगत कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी गटनेते प्रसाद आढाव, आरोग्य सभापती वैभव आढाव, नगरसेवक स्वप्निल मंजुळ, फिरोज पठाण, उमेश धुमाळ, वैभव गिरमे, निसार शेख, नईम शेख यांच्यासह स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS