Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निंभोरे पाटील परिवारातील ज्येष्ठांचा अभिष्टचिंतन सोहळा

श्रीगोंदा : घोटवी येथील निंभोरे पाटील परिवारातील ज्येष्ठ नागरिकांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मातृ-पितृ ऋणाची जाणीव ठेवत ६१ वर्षांनंतर अशा प्रकारचे सोहळे आयोजित करणे ही एक सुंदर परंपरा असून, यामधून ज्येष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, असा भाव या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला. या सोहळ्यात कांताबाई व दादासाहेब निंभोरे, सुलोचनाबाई व आप्पासाहेब निंभोरे, सुमतिबाई व आदरसिंग निंभोरे,  लताबाई व भास्करराव निंभोरे, आशाबाई व लालासाहेब निंभोरे, तसेच  सिंधुबाई संभाजी राजेभोसले, गं.भा. हिराबाई सदाशिव जठार, द्वारकाबाई सर्जेराव मोरे, पुष्पाबाई चंद्रकांत गायकवाड आणि  कमलबाई अंबादास राजेभोसले अशा परिवारातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. आपल्या आयुष्याचा मोठा काळ कुटुंबासाठी अर्पण करणाऱ्या या ज्येष्ठांना त्यांच्या समक्षच सन्मानित केल्याने त्यांना विशेष आनंद लाभल्याचे दिसून आले. कार्यक्रमात प्रमुख प्रवचनकार म्हणून ह.भ.प. घनश्याम आण्णा शेलार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, “आई-वडिलांची सेवा हेच खरे तीर्थ असून, त्यांच्या सेवेत घालवलेला प्रत्येक क्षण हा जीवनातील सर्वात मोठा धर्म आहे.” त्यांनी भक्त पुंडलिकाच्या उदाहरणातून पालकसेवेचे महत्त्व स्पष्ट केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश निंभोरे यांनी केले तर जालिंदर निंभोरे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला निंभोरे परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जामखेडमध्ये नर्सची स्वतःच इंजेक्शन लाऊन आत्महत्या   
विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवीबाळासाहेब थोरात : शासन पाठीशी घालते हे दुर्दैव; संग्राम भंडारे यांच्या कृतीचा निषेध
अवघ्या दोनशेच्या स्टॅम्पवर व्यावसायिक वीज कनेक्शन; शेतकऱ्यांना मात्र महिनोन्‌महिने प्रतीक्षा; कोपरगावात महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

श्रीगोंदा : घोटवी येथील निंभोरे पाटील परिवारातील ज्येष्ठ नागरिकांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मातृ-पितृ ऋणाची जाणीव ठेवत ६१ वर्षांनंतर अशा प्रकारचे सोहळे आयोजित करणे ही एक सुंदर परंपरा असून, यामधून ज्येष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, असा भाव या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.

या सोहळ्यात कांताबाई व दादासाहेब निंभोरे, सुलोचनाबाई व आप्पासाहेब निंभोरे, सुमतिबाई व आदरसिंग निंभोरे,  लताबाई व भास्करराव निंभोरे, आशाबाई व लालासाहेब निंभोरे, तसेच  सिंधुबाई संभाजी राजेभोसले, गं.भा. हिराबाई सदाशिव जठार, द्वारकाबाई सर्जेराव मोरे, पुष्पाबाई चंद्रकांत गायकवाड आणि  कमलबाई अंबादास राजेभोसले अशा परिवारातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. आपल्या आयुष्याचा मोठा काळ कुटुंबासाठी अर्पण करणाऱ्या या ज्येष्ठांना त्यांच्या समक्षच सन्मानित केल्याने त्यांना विशेष आनंद लाभल्याचे दिसून आले. कार्यक्रमात प्रमुख प्रवचनकार म्हणून ह.भ.प. घनश्याम आण्णा शेलार यांनी मार्गदर्शन केले.

त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की, “आई-वडिलांची सेवा हेच खरे तीर्थ असून, त्यांच्या सेवेत घालवलेला प्रत्येक क्षण हा जीवनातील सर्वात मोठा धर्म आहे.” त्यांनी भक्त पुंडलिकाच्या उदाहरणातून पालकसेवेचे महत्त्व स्पष्ट केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश निंभोरे यांनी केले तर जालिंदर निंभोरे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला निंभोरे परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

COMMENTS