नांदेड : वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर उपायुक्त निलेश शेवाळकर लिखित ‘शब्द शब्द तुझाच आहे’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. 7 जून 2

नांदेड : वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर उपायुक्त निलेश शेवाळकर लिखित ‘शब्द शब्द तुझाच आहे’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. 7 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता नांदेड येथील स्व. पूर्णामलजी लाहोटी सभागृह, सायन्स कॉलेज येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी, साहित्यिक व व्याख्याते इंद्रजीत भालेराव हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सुनील वेदपाठक, अभिजित राऊत, राहुल कर्डिले आणि अबिनाश कुमार उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. मनोहर चासकर, सुरज गुरव, रामकृष्ण सोलंके आणि सुदेश हिंगलापूरकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रेम, विरह, आईची माया, नात्यांची कोमलता आणि मानवी भावविश्व यांचे साध्या, संवेदनशील आणि हृदयस्पर्शी शब्दांत चित्रण या कवितासंग्रहातून करण्यात आले आहे. तरुणाईच्या भावना आणि सामान्य माणसाच्या मनातील न बोललेले भाव प्रभावीपणे व्यक्त झाल्याने साहित्यप्रेमींमध्ये या संग्रहाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रंथाली प्रकाशन निर्मित या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, रसिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथाली प्रकाशन व निलेश वसंतराव शेवाळकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS